शिराळा,ता.२२:माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मुंबईमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी केले.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम जवळील एका सभागृहात हा प्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक,सत्यजित नाईक, अभिजीत नाईक यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी आमदार शिवाजी गरजे, युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण ,आमदार इद्रिस नायकवडी ,निशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी पक्ष प्रवेश केला.
यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघातून सांगली जिल्हा परिषदेची माजी सदस्य रणधीर नाईक ,अभिजीत नाईक,माजी पंचायत समिती उपसभापती प्रल्हाद पाटील, इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सी. एच. पाटील ,यशवंत ग्लुकोज कारखान्याचे उपाध्यक्ष शहाजी पाटील, संचालक प्रकाश पाटील .रघुनाथ पाटील, विजय मुळीक, संभाजी पाटील, दत्तात्रय माने-आंधळकर, शहाजी पाटील ,वारणा कारखाना संचालक विजय पाटील , शिराळा बाजार समिती उपसभापती विजय महाडिक,भगवान मस्के,सुरेश पाटील ,सरपंच बाजीराव सपकाळ, सचिन पाटील, प्रमोद पाटील, पांडुरंग गायकवाड, विठ्ठल दळवी ,वसंत पाटील, मदन पाटील, पांडुरंग नायकवडी, राजू नेर्लेकर ,नाना भाष्टे, शहाजी माने,धनाजी सावंत, यांनी राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटात प्रवेश केला.
0 Comments