शिराळा,ता.१५ बुद्धगया येथे जागतिक बौध्द भिख्खुसंघाच्यावतीने सुरु असलेल्या "ब्राम्हणमुक्त महाबोधिविहार " आंदोलनास जाहीर पाठींबा देणेसाठी शिराळा तहसिल कार्यालयासमोर आज भारतीय दलित महासंघाच्यावतीने निदर्शनात्मक आक्रोश आंदोलन करण्यात आले.त्या नंतर भारतीय दलित महासंघाच्यावतीने आपल्या मागणीचे निवेदन महसूल नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांना देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद आढाव म्हणाले, बिहार राज्यात बुद्धगया या ठिकाणी धर्मांध हिंदु ब्राम्हण वाद्यांनी गौतम बुध्दांना ज्ञानप्राप्ती झालेल्या व जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पवित्र भुमिवर कब्जा केला आहे.सदरची पवित्र भुमि धर्मांध हिंदुत्ववाद्यांच्या जोखडातुन कायदेशीररित्या मुक्त व्हावी. या संविधानिक न्याय मागणीसाठी बौद्ध धम्मगुरुंच्यावतीने बुद्धगया या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणात्मक आंदोलनास जाहीर पाठींबा देणेसाठी आज आम्ही तहसिल कार्यालयासमोर निदर्शनात्मक आक्रोश आंदोलन करत आहे.
ते पुढे म्हणाले,भारतीय संविधान कलम २५ व कलम २६ अन्वये धार्मिक स्वातंत्र्याचा प्रत्येकास मूलभूत अधिकार दिला आहे. बुद्धगया महाबोधी विहारातील हिंदू धर्माची मक्तेदारी म्हणजे बौद्धांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर हा घाला आहे. आपल्या धर्माच्या आचारसंहितेचे जतन करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.बिहार सरकारने व पुरातत्व खात्याने जागतिक बौद्ध धम्मगुरूच्यावतीने ब्राम्हणमुक्त महाबोधि विहार या आंदोलनाची संवेदनशील रित्या दखल घेऊन बौद्ध धम्माच्या आचारसंहितेोर अन्याय करणारा १९४९ चा कायदा तात्काळ रद्द करावा. सदर आंदोलनाच्या दरम्यान बौद्ध गुरूंच्यावर बिहार पोलिसांची सुरू असणारी अरेरावी व दादागिरी तत्काळ थांबवावी.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत कांबळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरे, जिल्हाध्यक्ष विनोद आढाव,डॉ.विनोद झाडे ,सतीश झाडे,अमोल बडेकर,धनाजी तुपारे, संतोष कांबळे,सुहास कांबळे,सारिका घोलप,विकास मोहिते, सचिन कांबळे,प्रेम झाडे,शंकर लोखंडे,लक्ष्मण घोलप,शैलेश खोत, सुरेश मोहिते,विक्रम शेळके,सचिन मोरे,संतोष मोरे, शुभम मोरे,शरद मोरे,आदित्य मोरे,प्रकाश महापुरे,मनोज गायकवाड,शाहरुख पेठकर,विजय कदम,अजय आढाव,प्रवीण आढाव,सागर आढाव उपस्थित होते.यावेळी पोलीस हवलदार विनोद पाटील ,अमृत कुंभार,स्वप्नील दमामे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments