शिराळा :भारतीय जनता पार्टी नवीन संकल्प घेवून जनसामान्यासाठी काम करत आहे. कार्यकर्ता व जनतेच्या ताकदीवर पक्ष मोठा झाला असून पक्ष सभासद नोंदणीत कार्यकर्त्याचे योगदान मोठे असून त्याच्यामुळेच सभासद नोंदणीचे उद्दिष्ट साध्य झाले असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संमेलन मेळाव्यामध्ये ते बोलत होते. भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक, संपतराव देशमुख, भाजपा शिराळा तालुका मंडल अध्यक्ष हणमंतराव पाटील, सुखदेव पाटील, रणजीतसिंह नाईक ,प्रतापराव यादव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पै.अशोकराव पाटील,दत्तात्रय पाटील,संजय गांधी योजना शिराळा तालुका अध्यक्ष केदार नलवडे,पक्ष निवडणूक प्रभारी संजय हवालदार प्रमुख उपस्थित होते.
आमदार सत्यजित देशमुख म्हणाले :- भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ह्या पक्षाने कार्यकर्तेच्या पाठबळावर अनेक मोठ्या आव्हानांना सामोरे जात देशात व राज्यात सत्ता मिळविली आहे. देशात सलग तिसऱ्यां वेळी भाजपा ची जनतेच्या पाठींब्यावर आली आहे. पक्षाने सभासद नोंदणीचे उद्दिष्ट दिले ते कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीने पूर्ण झाले. देशात व राज्यात आपल्या विचाराचे सरकार आहे. जनतेमध्ये जाऊन काम करा, त्याचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले.
प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर म्हणाले :- देशाचे नेते नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सभासद नोंदणी मध्ये राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी झाले आहे पक्षांतर्गत निवडणुका या पुढील काळात होणार आहेत. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी ही संधी आहे. चांगल्या कार्यकर्त्याला निश्चितपणे संधी मिळेल असा विश्वास विक्रम पावसकर यांनी व्यक्त केला.
सम्राट महाडीक म्हणाले :- भाजपा कार्यकर्त्याला बळ देणारा पक्ष आहे. सभासद नोंदणीत मतदार संघाचे चांगले काम झाले आहे. सरकार च्या माध्यमातून घरा घरापर्यत पोहचा असे आवाहन सम्राट महाडीक यांनी केले.
यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनिताताई दस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई पाटील, प्रतापराव पाटील,सुजित देशमुख,शिराळा शहर अध्यक्ष कुलदीप निकम,बाजीराव शेंडगे,महिला आघाडी अध्यक्ष वैभवीताई कुलकर्णी,प्रदीप पाटील, मंगेश तिके, योगेश कुलकर्णी आदीसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments