पहा आय.पी.एस.बिरदेव यांचा जाहीर सभा या यु टूब चॅनेलच्या सौजन्याने जीवन प्रवास
सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम.
जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.
संपर्क 9890881782,9766293909
.
इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450
.
दिनांक २३ एप्रिल, मुंबईचा प्रवास, मंत्रालयामध्ये मा. विजय वडेट्टीवार साहेबाची भेट घेतली, मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्याशी संवाद साधला, संध्याकाळी मा. संजय राठोड साहेब यांची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी अनेकांना भेटायचा प्लॅन केला होता. काही प्रश्न होते. पण मन मुंबई मध्ये रमत नव्हते. कोल्हापूर, कागल मधील मेंढपाळाचा पोरगा बिरुदेव डोणे यूपीएससीच्या परीक्षेत निवडला गेला होता.
मन स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याला भेटायची मनामध्ये हुर हूर लागली होती. देश भरातल्या लाखो स्पर्धकांमध्ये तो यूपीएससीमध्ये निवडला गेला होता. मी रात्रभर प्रवास करून मुंबई वरून बेळगाव गाठलं पण बिरदेवचा एड्रेस सर्च होत नव्हता, लोकेशन सर्च होत नव्हतं. कारण तो मेंढ्यांच्या कळपा मागे कर्नाटकात एका खेड्या गावात काकांबरोबर मेंढ्यांच्या कळपा बरोबर गेला होता. TV9 चे पत्रकार विश्वनाथराव आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्याबरोबर बेळगाव येथे भेट घेतली, त्यांनी मग बिरदेवाचा एड्रेस आणि लोकेशन सांगितलं. त्याच बरोबर त्यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावर शुभम शेळके यांची मतं जाणून घेतली. लवकरच या प्रश्नावर सविस्तर चर्चा करायचे ठरले आणि तिथून निघालो ते तडख बिरुदेवाच्या शोधात. बिरदेव चिकोडी तालुक्यात जोदकुरली येथे बहिणीच्या घरी होता. दिवस मावळतीला गेला होता. तिथला नजारा काही औरच होता. तिथली माणसं मळकटलेली, कळकटलेली, शेळ्यांमेंढ्यामध्ये रात्रंदिवस आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळणारी, तेवढीचं भावनिक, तेवढीच प्रेमळ, आपल्या देव, धर्म आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये जीवन जगणारी, साध्याभोळ्या माणसामध्ये एक बिरुदेव नावाचा पोरगा दहावीला ९६% टक्के तर बारावील ८९ टक्के घेतो, COEP मधून Engineer होतो. तसा तो मेरिटचा विद्यार्थी पण सामाजिक स्थिती-गती, आठरा विश्वदारिद्र्य, आपला पारंपारिक व्यवसाय, आपलं राहणीमान, आणि भारत देशाची प्रगती यात प्रचंड तफावत असल्याचे प्रचंड आत्मभान निर्माण झालेला बिरुदेव, स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघाला होता.
सनदी परीक्षा द्यायची, सनदी अधिकारी व्हायचं, हा चंग त्यानं बांधला होता. उपजतच हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. प्रचंड मेहनत, दिल्लीला कोचिंग क्लास, क्लास पूर्ण करून परत पुण्यामध्ये कठोर मेहनत घेऊन, सनदी परीक्षा पास झाला. यूपीएससीच्या मेरिट लिस्ट मध्ये बिरुदेव डोणे याचं नाव वाचून महाराष्ट्रातल्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचा आनंद द्विगुणीत झाला. कोण बिरुदेव, कुठे राहतो, अख्खा समाज त्याच्या घराकडे धावायला लागला. माझं मन मला मुंबईत स्वस्थ बसू देत नव्हतं. मी तिकडे निघालो मनामध्ये अनेक प्रश्न येत होते.
इकडे नांदेडला एक धोबी(परीट) समाजाचा डॉ. शिवराज गंगावळ मेरिट लिस्ट मध्ये आला आहे. वंजारी समाजाची एक-दोन नव्हे तर सात - आठ पोरं यूपीएससीच्या मेरिट लिस्ट आली आहेत. जालना जिल्ह्यातील भाटेपुरी गावातला आकाश गोरे नावाचा माळी समाजाचा मुलगा यूपीएससीच्या मेरिट लिस्ट मध्ये आला आहे. बंजारा समाजाची २ पोरं मेरिटलिस्ट मध्ये आली आहेत. तांड्यावरची,वाड्यावरची, वस्त्यावरची पोरं देशातल्या सर्वात कठीण परीक्षेला सामोरे जात आहे आणि मेरिट मध्ये येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, समाज व्यवस्थेच्या शेवटच्या घटकाचं प्रतीनिधित्व जोपर्यंत इथल्या निर्णय प्रक्रियेत सस्टेन होणार नाही, तोपर्यंत भारतात लोकशाही पर्क्युलेट होणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये रिझर्वेशन पॉलिसी आणली. घटनेतील कलम १४-४ आणि १६-४ मध्ये आपल्या संविधानाने सकारात्मक भेदभाव स्वीकारला आणि उपेक्षितांच्या पोरांना निर्णय प्रक्रियेत घेण्यासाठी शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला रिझर्वेशन पॉलिसी लागू केली. SC - ST ला विधानसभा, लोकसभा मध्ये आरक्षण मिळालं पण OBC/VJNT ला ते मिळाल नाही. ती लढाई अजून बाकी आहे, त्यावर सविस्तर लिहीनच!
पण देशाच्या सर्वोच्च सनदी परीक्षांमध्ये कधी आरक्षणामधून तर मेरिटमधून शोषितांची, वंचितांची, भटक्यांची, बलुते, अलुत्यांची पोरं कलेक्टर,SP पदावर जायला लागली. आज बिरदेवानं IPS मध्ये स्थान पटकावलय. महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आनंद झालाय. त्याच्या नावातच बिरुदेव आहे. युपीएससीचा निकाल लागल्यानंतर त्याची पहिली मुलाखत धोतर, तीन-बटणी शर्ट, डोक्यावर धनगरी फेटा, हातात काठी, खांद्यावर घोंगड हा त्याचा पेहराव, महाराष्ट्रातल्या धनगरच्या पोरांची आण-बाण-शान वाढवून गेला.
महाराष्ट्रातल्या बाया बापड्यानी, मेंढक्यानी या आधुनिक बिरुदेवाचा कपाळ भरून भंडारा पहिला, त्याची जिद्द पाहिली, त्याचे मातीत रोवलेले घट्ट पाय आणि आपल्या मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्या नातेवाईकांची कनेक्टिविटी पाहिली. त्याच्या बोलण्यातून, चालण्यातून, शब्दागणिक ती दिसत होती. संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याची क्षमता आमच्यात पुरेपूर असल्याचं प्रत्यंतर बिरुदेवाच्या देहबोलीतून दिसत होतं. Anthropology (मानववंशशास्त्र) हा विषय आणि इंटरव्यू पॅनलने शेळ्या मेंढ्यावर विचारलेल्या प्रश्नांना सफाईदारपणे त्याने उत्तरे दिली. हा माणूस संपूर्ण समाज व्यवस्थेमधील शोषितांचा,वंचितांचा प्रशासनामधील प्रतिनिधी ठरेल यात शंका नाही. हाच मेंढपाळाचा पोरगा इथल्या पशुपालकांसाठी, शोषितांसाठी दिन दलितांसाठी बलुते अलुत्यासाठी भटक्या विमुक्त जातींसाठी, त्यांच्या सामाजिक न्यायासाठी काम करेल यात शंका नाही, कारण तो मेंढपाळाचा पोरगा आहे.
- प्रा. लक्ष्मण हाके
0 Comments