पहा आय.पी.एस.बिरदेव यांचा जाहीर सभा या यु टूब चॅनेलच्या सौजन्याने जीवन प्रवास
शिराळा,ता.२४ :अंत्री खुर्द (ता.शिराळा) येथील जोतीर्लीग देवाच्या यात्रे निमिताने आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या झालेल्या पै.सुरज पाटील (मोतीबाग तालीम कोल्हापुर) विरुद्ध पै.स्वराज तामखडे (गंगावेश तालीम कोल्हापुर) या कुस्तीत अतितटीच्या लढतीनंतर स्वराज तामखडे गुणावर विजयी झाला.
प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन सरपंच दिलीप पाटील,उपसरपंच संजयदीप पाटील,प्रचिती दुध संघाचे माजी संचालक संजय पाटील,बाळसाहेब पाटील,सचिन केसरकर,गणेश पाटील,माजी उपसरपंच सचिन पाटील,विनायक पवार,सेवा सोसायटीचे अध्यक्ष उत्तम पाटील,संजय पाटील ,पांडुरंग पाटील,संदीप पाटील,निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण ,राम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. द्वितीय क्रमांकाची कुस्ती पै.ऋतुराज शेटके (राशिवडे) विरुद्ध पै.अजय शेडगे (न्यु मोतीबाग तालीम कोल्हापुर) यांच्यात झाली .या कुस्तीत ऋतुराज शेटके घुटना डावावर विजयी झाला.तृतीय क्रमांक कुस्ती पै.दत्ता बानकर (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) विरुद्ध पै.राहुल आलदार (सांगली) या कुस्तीत दत्ता बानकर गुणावर विजयी झाला.चतुर्थ क्रमांक कुस्ती पै.धीरज पाटील (अंञी )याने पै.दिलीप बंडगर सांगली याच्यावर प्रेक्षणीय विजय मिळविला.पाचव्या क्रमांकाची कुस्तीत पै.मयुर पाटील (पाडळी) याने पै.सुनिल करवते (कवठेपिरान) याच्यावर विजय मिळविला.स्थानिक विजयी मल्ल - पै.अतुल चौगुले, पै.साहिल चौगुले, पै.दिगंबर पाटील, पै.गणेश पाटील ,धीरज पाटील,यांनी चटकदार कुस्त्या करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. इतर विजयी मल्ल असे -विवेक लाड (येळापूर) ,प्रणव पाटील (शेडगेवाडी) , पृथ्वीराज चव्हाण (वाकुर्डे खुर्द ) ,फिरोज शेख (शिराळा) ,ओंकार डिसले (शिराळा ), ओंकार पाटील (पणुंब्रे) , साई सनगर (कापशी) , रोहीत पाटील (कासारशिरंबे) , सौरभ पाटील (वाकुर्डे)
पंच म्हणून सुदाम पाटील,शिवाजी पाटील,नामदेव पाटील,पांडुरंग मुळीक,ऋषिकेश पाटील,मानसिंग पाटील,वाय.बी.पाटील,रघुनाथ पाटील,अर्जुन पाटील यांनी काम पाहिले.यावेळी पै.शिवाजी लाड, प्रतापसिंह चव्हाण,आनंदराव पाटील,राहुल जाधव,कुंडलिक गायकवाड, नितीन सलगर,विश्वास मुळीक,विलास मुळीक,दादासो पाटील, रवींद्र माने,विशाल केसरकर,सुमित केसरकर, प्रवीण पाटील, यांची उपस्थिती होती.मैदानाचे समालोचन पै.सुरेश जाधव व हलगीवादन साठे बंधू वाटेगाव यांनी केले.
मल्लांना तूप वाटप
प्रचिती दुध संघाचे माजी संचालक संजय पाटील व अर्जुन पाटील यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व विजेता व उपविजेता मल्लांना तूप वाटप केले.त्यांचा हा सामाजिक उपक्रम गेले चार वर्षा पासून सुरु आहे.
0 Comments