शिराळा,ता.११ :सांगली ,कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गिरजवडे (ता. शिराळा) येथील श्री जोतिबा देवाची यात्रा उद्या १२ मार्च पासून सुरु होत आहे. त्या निमित्ताने ......
सकाळी ७ वाजता दंडस्नान सकाळी ९ ते११ वाकुर्डे,शिरशी,पणुंब्रे तर्फ शिराळा,धामवडे,गिरजवडे,पाचुंद, गुंडेवाडी,केदारवाडी या ठिकाणाहून मानाच्या सासनकाठीचे आगमन होणार आहे. दुपारी १ ते ३ अंबीलगाडा, बैल गाडी व सासनकाठीचे आगमन होणार आहे. रात्री १० नंतर छबीन्यास सुरुवात होणार आहे. १३ रोजी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून १४ रोजी पाकाळणी होणार आहे. मंगळावारी (ता.१५)रोजी रात्री ९ वाजता शाहीर देवानंद माळी यांच्या मराठी पाउल पडते पुढे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
रविवारी दुपारी ३ वाजता प्रथम क्रमांकाची जोतिर्लिंग ग्रामविकास मंडळ गिरजवडे -मुंबई यांच्यावतीने पै. भरत लोकरे हनुमान आखाडा पुणे व पै.सागर काळेभाग पवार तालीम सांगली यांच्या कुस्ती होणार आहे, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती शिरशी येथील सरपंच स्मिताताई भोसले व उद्योजक बापू कृष्णा लोहार घागरेवाडी यांच्यावतीने पै. अजित पाटील सावे व पै. अभिजित जाधव कडेपूर यांच्या होणार आहे. तृतीय क्रमांकाची कुस्ती कै.जोती चंद्रु कांबळे व कै .सुजाता दादा साळवी यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत जोती कांबळे यांच्यावतीने पै. सुरज पाटील शित्तूर व पै.सुरज जाधव कडेपूर यांच्या होणार आहे.चतुर्थ क्रमांकाची कुस्ती कल्पनाताई गणपतराव विद्यालय धामवडे यांच्यावतीने अशोक बाबुराव माने यांच्या स्मरणार्थ, पुणे पोलीस पै. पवन अशोक माने यांच्याकडून पै. प्रतिक मुळीक गिरजवडे व पै.राजवीर पाटील पेठवडगाव यांच्या होणार आहे.
कै.रघुनाथ आण्णा नलवडे महाराज यांच्या स्मरणार्थ लालासो रघुनाथ नलवडे व सरपंच सचिन देसाई, संदीप देसाई यांच्याकडून पाचव्या क्रमांकाची कुस्ती पै. सिद्धार्थ पाटील गिरजवडे व पै.सुहास पाटील वारणा यांच्या होणार आहे. स्थानिक मल्ल म्हणून समर्थ देसाई,कोहिनूर मुळीक,हर्षवर्धन कुंभार, राजवर्धन कुंभार,सिद्धेश मुळीक,आरव माने यांच्या कुस्त्या होणार आहे.निवेदक म्हणून पै.भरत पाटील,पै. सिद्धार्थ पाटील गिरजवडे ,हलगीवादक विशाल घेवदे मांगले,शिंगवादक म्हणून प्रवीण पाटील पुजारी गिरजवडे हे काम पाहणार आहेत. तरी सर्व भाविकांनी व कुस्ती प्रेमींनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच सचिन देसाई, यात्रा कमिटी आणि देवस्थान समिती आणि ग्रामस्थ गिरजवडे,मुळीकवाडी,मोंडेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments