तहसीलदार कार्यालय वेबसाईट पाहण्यासाठी क्लिक करा
शिराळा तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात हा लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी शामला खोत-पाटील म्हणाल्या ज्या महापुरुषांना आपण पूजतो,ज्यांचा आदर्श घेतो,त्यांच्या आदर्शने प्रेरित होऊन काम करावे.लोकांच्या पर्यंत आमचे अधिकारी कसे पोहचतील यासाठी आमचा सतत प्रयत्न सुरु आहे.माणसाला मरण येत असले तरी त्यांच्या चांगल्या विचारांचा अंत कधीच होतं नाही.त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकहितासाठी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे.यावेळी राजेद्र पाटील म्हणाले,आम्ही अधिकारी असलो तरी आपले सेवक आहे.येथे येणाऱ्या प्रत्येकांच्या प्रश्नांची व अडीअडचणीची सोडवणूक करण्याचा आमचं नेहमीच प्रयत्न असतो.
स्वागत व प्रास्ताविक महुसूल नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी केले.प्रारंभी तहसीलदार शामला खोत-पाटील यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर जयंतीच्या निमित्तने जीवंत सातबारा,दिव्यांग प्रमाणपत्र व विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन तहसीलदार शामला खोत-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अन्न पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना आता पुरवठा विभागातील शिधापत्रिका ची कामे घरात बसून करता येतील.यांचा लाभ गरजू लोकांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार खोत-पाटील यांनी केले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार हसन मुलाणी,नायब तहसीलदार राजाराम शिद,पुरवठा निरीक्षक शारदा रेळे,अव्वल कारकून शशिकांत सूर्यवंशी,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत कांबळे,दयानंद शिवजातक,भारतीय दलित महा संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद आढाव,दिनकर पवार,विजय कांबळे,आदेश कांबळे उपस्थित होते.आभार हसन मुलाणी यांनी मानले.
mahafood.gov.in या अन्न पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर आर.सी.एम.एस.ही ऑनलाईन प्रणाली आहे.त्या ठिकाणी लोकांच्यासाठी public loginआहे.त्या login मधून शिधापत्रिकेत नाव वाढविणे,कमी करणे,पत्ता बदल,कुटुंब प्रमुख बदल,नवीन शिधापत्रिकासाठी१२ अंकी नंबर मिळवणे ही कामे घर बसल्या करू शकता.यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
शारदा रेळे (पुरवठा निरीक्षक)
प्रज्ञेचा सूर्य उगवता
शतकांचा अंधार संपला
बहु जनांच्या सावलीसाठी
वटवृक्ष खुद्द निपजला
जातीपुरते कुठे
शब्द तुझे भांडले
समतेच्या सागराची
लाट ते जाहले.
स्मृतीत आहे माझ्या
जे भोगले... जगले
दहन तु केलेस त्याचे
आणि
ती ..चे
कैक जन्म उजळले
तहसीलदार शमला खोत-पाटील यांनी त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कविता सदर करून आपल्या भाषणाचा समारोप केला.
0 Comments