BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा गोरक्षनाथ यात्रा विशेष २०२५

 






 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

 

   


शिराळा,ता.२३:प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा येथील गोरक्षनाथ यात्रेत हजारो भाविक आज दिंड्या सह दाखल होणार आहेत. ज्या लोकांना आषाढी यात्रेला पंढरपूरला जाता येत नाही ते लोक येथे नाथ दर्शनाला येतात. कारण  एकादशीला  स्वतः विठ्ठल गोरक्षनाथ यांच्या दर्शनाला  व स्नानान करण्यासाठी येतात. त्यांचे  दिवसभर येथे त्यांचे वास्तव्य असते अशी आख्यायिका आहे. येथे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो भाविकांची गर्दी असते. ही  यात्रा आज गुरुवारी  २४  एप्रिल पासून सुरु होत  असून ती सात दिवस म्हणजे अक्षय तृतीये पर्यंत  आहे. त्या निमित्त .......

  हनुमान जन्मोत्सवा नंतर येणाऱ्या एकादशी पासून  यात्रेस प्रारंभ होतो. यात्रेच्या पहिल्या दिवशी राज्यातील विविध भागातून वारकरी दिंड्या येतात. गोरक्षनाथ यांना महाअभिषेक घालून आरती केली जाते. शिराळ्यात गोरक्षनाथ यांनीच जिवंत नागाची पूजा सुरू केल्याची आख्यायिका आहे. नाथ शिराळा येथे महाजन यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले.त्यावेळी महिलेस भिक्षा देण्यास वेळ का झाला असे नाथांनी विचारले. त्यावेळी मी मातीच्या नागाची पूजा करत असल्याचे कारण महिलेने सांगितले.त्यावेळी तू जिवंत नागाची पूजा करशील का असे नाथांनी विचारताच महिलेने होकार दिला.त्या ठिकाणी जिवंत नाग प्रकट झाला.त्या वेळे पासून शिराळ्यात जिवंत नाग पूजा सुरू झाली होती. पूर्वी येथे गोशाळा होती.त्या नंतर ती बंद झाली. सध्याचे मठाधिपती पारसनाथ महाराज  यांनी गो शाळा पुन्हा सुरू केली आहे. त्यांच्या हाती मठाचा कारभार आल्या पासून त्यांच्या माध्यमातून आनंदनाथ महाराज  यांनी मठ परिसराचा कायापालट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.  त्यांना स्वप्निल निकम व  संतोष हिरुगडे यांच्या सह इतरांचे सहकार्य लाभत आहे.

या यात्रेसाठी येणाऱ्या दुकानदार व पाळणे व्यावसायिक यांना दिवाबत्ती,पाणी,जागावाटप आणि  विविध सुविधा पुरविण्याबाबत मठाधिपति पारसनाथजी महाराज, आनंदनाथ महाराज  व शिराळा नगरपंचायत  एकत्रित प्रयत्नशील आहेत. २९ एप्रिल रोजी कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. या यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून हजारो भाविक येतात. त्यामुळेआरोग्याच्या दृष्टीने मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी, सर्व शहरात औषध फवारणी व धुर फवारणी केली  आहे.सार्वजनिक तसेच स्टॉल धारकांना २४ तास  दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली  आहे. भेळ गाडे,आईस्क्रिम गाडे,खेळणी,मिठाई,हॉटेल व अन्य दुकाने ,पाळणे यांची गर्दी झाली आहे.. यात्रे दरम्यान  नियंत्रण कक्ष,आरोग्य पथक कक्ष,पोलीस चौकी तसेच यात्रेकरूना दर्शनाला जाण्यासाठी मार्ग करण्यासाठी  लाकडी बॅरेकेट करण्यात आली आहेत. १४ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असून आग प्रतिबंधक उपाय योजना म्हणून अग्निशामक गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.शिराळा आगारा कडून शिराळा ते नाथ मंदिर अशी पाच एस.टी. बसेसची  सोय करण्यात आली आहे. गरजेनुसार आणखी गाड्यांची सोय करण्यात येणार आहे.शिराळा पोलीस ठाण्याच्यावतीने चार अधिकारी व ४५ पोलीस कर्मचारी आणि एक स्ट्रायकिंग पथक नेमण्यात आले आहे.  शिराळा शहर ते नाथ मंदिर परिसरात पर्यंत विविध संघटना,पक्ष व सामाजिक संस्था यांनी स्वागत कमानी उभारल्या आहेत.


शिराळा येथे प्रत्येक १२वर्षा नंतर नाथ झुंडीचे आगमन होते. २८नोव्हेंबर  २०१५ ला या झुंडीचे आगमन झाले होते. त्यावेळी ३० वर्ष नंतर पाच किलोचा नाथ रोट तयार करण्यास सुरुवात केली. तो रोट प्रत्येक शनिवारी रात्री बारा नंतर केला जातो. रविवारी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून दिला जातो.


२८ नोव्हेंबर २०१५ ला नवनाथांची झुंड शिराळ्यात आल्या पासून येथे अखंड ज्योत मंदिरात सुरू आहे. ती ज्योत अगोदर गेले सात वर्षा पासून हिमालयात सुरू होती. झुंड शिराळ्यात आली .त्यावेळी ती सोबत आणली आहे.ती एकूण बारा वर्षे तेवत राहणार आहे. यासाठी तूप वापरले जाते. त्या ठिकाणी ओम नमो शिवायचा अखंड जप सुरू आहे. त्यासाठी मठातील साधू अदलुन,बदलून बसतात. मंदिर बाहेर झुंडीच्यावेळी तयार केलेली धुनी ही अखंडपणे पेटत असून ती बारा वर्षे म्हणजे सन २०२७ पर्यंत पेटत राहणार आहे.


Post a Comment

0 Comments