शिराळा : शिराळा उपजिल्हा रुग्णालयात आठ डायलेसिस मशीन उपलब्ध झाल्या आहेत.त्याच्यावर प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरू करण्यात आली असून सततच्या पाठपुराला यश आले असल्याची माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली.
शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे आठ टायलेसिस मशीन उपलब्ध झाली.त्याची पाहणी आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.यावेळी माजी जिल्हा परिषद के.डी पाटील, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील, पृथ्वीसिंह नाईक उपस्थित होते.
यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले, शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे डायलेसिस मशीन उपलब्ध करून देण्याबाबतचा संकल्प मी केला होता.आज तो सत्यात येत असून आज आठ डायलेसिस मशीन उपलब्ध झाली आहेत.त्याचा आनंद आहे. आज प्रत्यक्ष डायलेसेस करावे लागणाऱ्या रुग्णास सेवा सुरु करण्यात आली आहे. आम्ही सतत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.यामुळे गरीब व गरजू रुग्णांना चांगली सेवा मिळेल. त्यांचा वेळ व पैसा वाचेल.उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे एक्स-रे मशीन व सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाली आहे. त्याच्या माध्यमातून ही रुग्ण सेवा दिली जात आहे.या पुढील काळात सिटीस्कॅन मशीन व एम.आर.आय मशीन उपलब्ध करुन रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथील आठ डायलेसेस मशीन चा उद्घाटन समारंभ लवकरच होईल.
तसेच कोकरूड ग्रामीण रुग्णालय येथे हा डायलेसेस मशीन पुढील आठवड्यात उपलब्ध होतील अशी माहिती आमदार देशमुख यांनी दिली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.नूतन गौरी कणसे, डॉ गायत्री यमगर, डॉ. मनोज महिंद, डॉ.समाधान यमगर डॉ.धस यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments