शिराळा :वन्य प्राण्यांच्या उपद्रव रोखण्यासाठी वन्य विभागा मार्फत चर खोदण्याचे कामास सुरवात झाली असून या कामामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले.
बेलेवाडी ,उपवळे (ता.शिराळा) येथे वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वन्य विभाग हद्दीलगत चर खोदण्याचे काम सुरू असून त्या कामाची पाहणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी ग्रामस्थ समवेत केली.त्यावेळी ते बोलत होते. रीळे सरपंच बाजीराव सपकाळ,वनपाल अनिल वाजे,बेलेवाडी सरपंच बजरंग जाधव व उपवळे सरपंच संभाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाईक पुढे म्हणाले, चांदोली अभयारण्यामधून चाऱ्याच्या टंचाईमुळे गवे व इतर वन्य प्राणी जंगलाच्या बाहेर पडल्याने अनेक गावांमध्ये शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे .गवे व रानडुकरांचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक ठिकाणी दोन-दोनशे एकर जमिनीचे क्षेत्र पडून राहिले आहे. नागरी वस्तीमध्ये वन्य प्राण्यांचे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. हा सर्व उपद्रव रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक वेळा मोर्चे व ठिय्या आंदोलन करणेत आले होते. गत वर्षी शिराळा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित विभागाकडून ठोस लेखी आश्वासन घेणेत आले होते. यावेळी तहसीलदार यांच्या दालनात अधिकारी व आंदोलक शेतकरी याच्यामध्ये बैठक होऊन ताबडतोब शासनाशी पाठपुरावा करून प्रादेशिक वन विभागाने आपल्या सर हद्दीने संरक्षण कुंपण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येईल याचे जर अदाजपत्रक जास्त रकमेचे झाले व वेळ लागेत असेल तर प्राथमिक स्वरूपात चर मारून वन्य प्राणी खाजगी क्षेत्रात येऊन नुकसान करत आहेत त्याचा बंदोबस्त करण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले होते. त्यानुसार बेलेवाडी, रीळे, उपवळे, तडवळे येथे प्रत्येकी ३.२५ की मी अंतराची ३ मीटर रुंद व २ मीटर खोल चर मारण्याचे कामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांच्यामुळे होणारे नुकसान थांबून थोडा फार प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.शासनाने चांदोली अभयारण्याचा तारेच्या कुंपणाचा प्रंबित असलेला प्रस्ताव मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावावा. हाच शेतकऱ्यासाठी एकमेव महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे.
यावेळी मोहन सुतार,संपत देसाई, माजी सरपंच दिलीप जाधव, दिनकर बसरे, बजरंग जाधव सरपंच ,प्रकाश जाधव, महादेव बसरे,विठ्ठल जाधव, मधुकर जाधव ,बाजीराव चोरगे, अंकुश जाधव, अनिकेत जाधव अविनाश जाधव, दिलीप पाटील,यश जाधव , सरपंच संभाजी पाटील ,प्रवीण पाटील ,अजित पाटील, पोपट कदम, श्रीकांत पवार, ब्रह्मदेव गुरव, अतुल पाटील, लालासो पाटील, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
0 Comments