माजी मंत्री अजितराव घोरपडे,माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख व इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात मिरज येथे गोपनीय बैठक झाली. बैठकीत सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करण्यावर अंतिम निर्णय झाला. त्याला विलासराव जगताप यांच्याकडून दुजोरा दिला आला आहे.
सांगली जिल्ह्याच्या राजकारणात घोरपडे, जगताप, नाईक, देशमुख यांनी कायम दबदबा राखला. मात्र, गेल्या काही वर्षांत पक्षाकडून होणाऱ्या पक्षांतर्गत खच्चीकरण व गळचेपी करण्याचा आरोप करत उघड-उघड पक्षाच्या विरोधात नाराजी या नेत्यांनी व्यक्त केली. राजकीयदृष्ट्या हक्काच व्यासपीठाच्या प्रतीक्षेत ही मंडळी होती. दरम्यान राष्ट्रवादी (अजित पवार) कडून मोठ्या राजकीय गटाचा शोध सुरू होता.यापूर्वी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना शह देण्यासाठी निशिकांत भोसले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला.
मात्र, सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक व राजेंद्र देशमुख यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पक्षाला सांगली जिल्ह्यात आणखी बळ मिळणार आहे.भाजप, शिवसेना पक्षांवर नाराज होऊन बाहेर पडलेल्या घोरपडे, जगताप, नाईक, देशमुख यांना पक्ष प्रवेशासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मिरज येथे या नेत्यांची गोपनीय बैठक झाली. बैठकीत पक्ष प्रवेशाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा ही घडून आली.
त्यानंतर काल मिरज येथे झालेल्या बैठकीत अखेर पक्षप्रवेशासंदर्भात अंतिम निर्णय झाला. याबाबत माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिला. प्रमुख पदाधिकारी, कार्यकत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचेही सांगितले.
0 Comments