BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माणूस घडवणे हा साहित्याचा हेतू

 


 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

     

शिराळा,ता.८:माणूस घडवणे हा साहित्यचा हेतू असतो. कोणत्याही कवी अथवा लेखकांची भूमिका ही माणसाच्या मनाशी व हृदयाशी जोडलेली असते.म्हणून लिखान करण्यासाठी माणसाचं मन आणि हृदय कळले पाहिजे.हे फक्त संवेदनशील माणसाला कळतं.तीच माणसं व्यक्त होत असतात.कृतीतून व्यक्त होणारी व्यक्ती संवेदनशील असते असे प्रतिपादन कवयित्री मनिषा पाटील यांनी केले.

पणुंब्रे वारूण(ता.शिराळा)येथे शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पणुंब्रे वारुण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या डोंगरी संमेलन प्रसंगी निमंत्रितांच्या कवी संमेलनात अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.या कवी संमेलनात सूत्रसंवाद कवी सुभाष कवडे यांनी साधला.यावेळी मनिषा पाटील म्हणाल्या,काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही हे सांगणारी माणसं असायला हवीत.त्यावेळी लिखनाला वाव मिळतो.माणसांच्या हातात साहित्याचा उजेड देणारी मानसं हवीत.माणसं निघून गेली की त्यांचे महत्व कळते.त्यासाठी माणसं हयात असताना त्यांचा गौरव व्हायला हवा.प्रत्येकाच्या कवितेला दाद द्यायला हवी.महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.यंत्र युगाने माणसाला एकाकी पणा दिला आहे.

यावेळी भीमराव धुळूबुळु यांनी आत खोल खोल,बहीण भाऊ यांच्या नात्यामधील वीण व्यक्त करणारी भारती पाटील यांनी भाऊराया,भरत खराडे यांनी जीवाचा पोत्यार,भगवान पाटील यांनी सांग विठ्या रे,नथुराम कुंभार यांनी मायबाप, भीमराव कुंभार यांनी छावा,हर्षवर्धन इंगळे याने स्पर्धेचे युग,विक्रम जाधव यांनी यम है हम,सोमनाथ पाटील यांनी वर्दी,रवी बावडेकर,कोमल मस्कर,संजय पोळ यांनी आपल्या कविता सादर केल्या.यावेळी कवी प्रदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी कथाकर विश्वनाथ गायकवाड,संमेलनाचे स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील,विश्वासचे संचालक शिवाजीराव पाटील,महेश जंगम,मानसिंग पाटील,मन्सूर नायकवडी,अशोकराव जाधव,सचिन पाटील,प्रकाश जाधव,श्रीकृष्ण कुसळे,आनंदा कुसळे,निलेश आवटे,माजी सरपंच नथुराम सावंत उपस्थित होते.आभार निमंत्रक वसंत पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments