शिराळा,ता.३१:सांगली जिल्ह्याला ड्रगचा कलंक लागला आहे.आपल नशीब चांगलं आहे ; या ड्रगच्या चर्चेत शिराळा विधानसभा मतदारसंघाचे नाव कुठे ही नाही. याचे खरे कारण शिराळा विधानसभा मतदार संघात असणाऱ्या पोलीस ठाण्यातील पोलिसांचा असणारा जागता व खडा पाहरा हे आहे.समाज विघातक तत्वांना आपण येथे शिरकाव होऊन दिलेला नाही हे खऱ्या अर्थाने पोलीस खात्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. कमीत कमी गुन्हेगारी व्हावी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे.आपल्या कडून गोरगरिबांना त्रास होऊ नये.फाळकुट दादांच्या माध्यमातून गोरगरिबांना कुठे त्रास होत असेल तर अशा दडपशाहीची कोणती ही गय न करता कायद्याचा बडगा उगारा.याबाबत मी कोणाला पाठीशी घालणार नाही.सामान्य,गरीब,शोषित ,पीडितांना न्याय द्या.मी फोन न करता त्यांना न्याय मिळाला तर मला जास्त आनंद होईल असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत सुरक्षित रस्ता उपक्रमांतर्गत येण्या-जाण्यासाठीच्या सुरक्षित रस्ता मार्गाच्या (safe Street moment) उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी देशमुख म्हणाले,जनतेच्या रक्षणासाठी कायम तत्पर असणाऱ्या पोलीस यंत्रणेला चांगल्या प्रकारे काम करता यावे यासाठी त्यांना निवासस्थानासह चांगल्या पायाभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे.त्या मिळाल्या तर त्यांना उत्स्फूर्तपणे काम करता येईल.काम करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी न वाटता उत्साहपूर्ण वातावरणात काम करता आले पाहिजे.त्या सुविधा मिळवून देण्यासाठी माझा सतत पाठपुरावा राहील.तुमच्या असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उणीवा माझ्या पर्यंत पोहचवा.या चार वर्षात तुमच्या असणाऱ्या सर्व उणिवांची टप्याटप्याने तड लावून आदर्श पोलीस व्यवस्था निर्माण करू.
पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम म्हणाले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत सुरक्षित रस्ता उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक संदीप घुगे,अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर,उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलीस ठाणे हद्दीत गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चौक शिराळा ते पोलीस लाईन समोरील १५० मीटर रस्ता हा येण्या-जाण्यासाठीच्या सुरक्षित रस्ता मार्ग (safe Street moment) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
स्वागत व प्रास्ताविक पोलिस उपनिरीक्षक राहुल अतिग्रे यांनी केले.यावेळी रणजितसिंह नाईक, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, पोलिस उपनिरीक्षक उदय पाटील, श्रीराम नांगरे,पोलीस पाटील शंकर वडार, सीताराम पाटील ,युवराज पाटील,मोहन घागरे,बाबासाहेब वरेकर, सचिन गुरव,प्रदीप शिंगटे ,बजरंग कुंभार ,रुपाली तिके यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते.
विशेष सत्कार
यावेळी शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्पर सेवा देणाऱ्या श्रीराम नांगरे व कुठे ही व्यक्ती मयत झाल्यास त्यांना आणण्यासाठी कायम वाहनासह मदत करणाऱ्या अस्लम नदाफ यांचा विशेष सत्कार आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
0 Comments