शिराळा : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली महानिदेशक ,अग्निशमन सेवा,नागरीक संरक्षण आणि गृह रक्षक विभाग यांच्या अंतर्गत स्थापन झालेल्या रुग्णालये आणि नर्सिंग होम्समधील अग्निसुरक्षेवर कार्य करणाऱ्या राष्ट्रीय समितीत शिराळा येथील आबासाहेब काळे यांची निवड झाली आहे.
ही समिती राष्ट्रीय इमारत संहिता (NBC) २०१६ पूर्वी बांधलेल्या लहान आणि मध्यम आकाराच्या आरोग्य सुविधांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे मूल्यमापन करून सुधारणा सुचवेल. यामध्ये विद्यमान त्रुटी ओळखणे, व्यवहार्य उपाय सुचवणे आणि संरचित धोरण प्रस्तावित करणे यावर भर दिला जाणार आहे.यावेळी काळे म्हणाले, “अग्निसुरक्षा केवळ नियमांबाबत नाही, तर ती पूर्व सज्जता आणि रुग्ण सुरक्षा यांच्यात लवचिकता निर्माण करण्याची संस्कृती आहे. या समितीच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील अग्निसुरक्षेसाठी योगदान देण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद वाटतो.संतोष वारिक चीफ फायर ऑफिसर एमआयडीसी व डायरेक्टर महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस यांचे विशेष सहकार्य लाभले. ही समिती लवकरच आपले धोरण आणि शिफारसींवर काम सुरू करणार असून, आरोग्यसेवा क्षेत्रातील अग्निसुरक्षा सुधारण्यासाठी ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
0 Comments