शिराळा : मंगळवार सायंकाळी साडे पाच वाजण्याची वेळ ....शिराळा तालुक्यातील तडवळे परिसरात पाऊस,वादळी वारा सुरु झाला शेतात असणारे लोक पावसाच्या व विजांच्या भीतीने घराच्या ओढीने शेतातून निघाले. त्या प्रमाणे मोरणा नदी काठी असणाऱ्या शिप्याची नाळ येथे भांगलणीसाठी गेल्या सुनंदा पांडुरंग पाटील ह्या लक्ष्मी संभाजी पाटील, नंदा पाटील, शांताबाई पाटील यांच्या सोबत घरी निघाल्या. इतर महिलांच्या सोबत शेतीपासून पंधरा ते वीस फूट अंतरावर आल्या.
त्यावेळी घाईघाईने निघत असताना आपले चप्पल शेतात राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले.ते आणण्यासाठी परत गेल्या. चप्पल हातात घेऊन परत फिरल्या असता त्यांच्या अंगावर वीज मृत्यू झाला.आपल्या समोर सुनंदा गेल्याने उपस्थित महिलांनी भीतीने थरकाप उडला व त्यांनी हंबरडा फोडला. सकाळी घरातून बाहेर पडताना आज आपण कायमचं घराबाहेर पडणार यांची पुसटशी ही कल्पना तिला नव्हती.सुनंदा यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांना सचिन अविवाहित एकच मुलगा आहे.तो मुंबई येथे नोकरीस आहे. त्यामुळे त्या गावी एकट्याच होत्या. पुढील महिन्यात गावची यात्रा असल्याने तो यात्रेसाठी गावी येणार होता.मात्र नियतीने त्याला गावाच्या यात्रेला आणि आईच्या भेटील नव्हे तर तिच्या अंत्ययात्रेला येण्यास भाग पाडले.सचिन हा आता आईवडिला विना पोरका झाल्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे. तो मुंबई वरून आल्यानंतर आज बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments