BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विना परवाना उपचार प्रकरणी गुन्हा दाखल

 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

   


शिराळा,ता.१२:खेड (ता.शिराळा) येथील जालिंदर महादेव माळी (सध्या मयत ) यांच्यावर  प्रकाश बाळु मकामले-पाटील(येळापूर पैकी कुंभवडेवाडी (ता.शिराळा)  याने कोणती ही वैद्यकीय पदवी व रुग्णावर उपचार करण्याचा परवाना नसताना त्यांच्याकडून पैसे घेवून  बायोहेल्थ मशीनद्वारे चुकीच्या पध्दतीने उपचार करून फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत उपजिल्हा रुग्णालय शिराळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जुबेर कादर मोमीन (वय ५०)यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश मकामले- पाटील यांच्याकडे  कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. बायो हेल्थ मशीन विक्री करण्याची परवानगी आहे. त्या मशीनव्दारे रुग्णावर उपचार करण्याचा परवाना नसताना त्यांनी खेड येथील जालिंदर महादेव माळी यांच्यावर सांधीवात व मणक्याचा विकारावर सोमवार पेठ शिराळा येथे बायोहेल्थ मशीनवर १० ते १३ जुलै २०२२ दरम्यान चुकीच्या पध्दतीने उपचार करुन फसवणुक केली आहे. त्या उपचारामुळे माळी यांना त्रास झाला.त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिक्त्सक यांना दिल्याने त्यांनी उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथील अधीक्षक यांना चौकशीचे आदेश दिले.त्यावेळी पाटील यांच्याकडे  कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. बायो हेल्थ मशीन विक्री करण्याची परवानगी आहे. 

त्या मशीनव्दारे रुग्णावर उपचार करण्याचा परवाना नसताना उपचार केल्याचे आढळून आले.त्यांनी तसा अहवाल वरिष्ठांना पाठवला. त्यानंतर माळी यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडे तक्रार दाखल केली.  त्या नंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सांगली  यांनी २८ ऑगस्ट २०२४  रोजीच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रकाश बाळु मकामले-पाटील यांच्या विरुध्द महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१चे कलम ३३,३३-अ, भारतीय दंड संहिता कलम ४१९,४२० अन्वये  शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिगरे करत आहेत.

Post a Comment

0 Comments