BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अभयारण्याच्या विविध प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा



 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

   

शिराळा ,ता.९:चांदोली अभयारण्यलगत असणाऱ्या गावांच्या  प्रश्नासंदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी कराड येथील वन्यजीवच्या कार्यालयाच्या उपसंचालक स्नेहलता पाटील यांच्याशी  चर्चा केली,यावेळी  असणाऱ्या विविध प्रश्नांच्या संदर्भात लवकरच मार्ग काढण्याचे  आश्वासन  स्नेहलता पाटील यांनी दिले. 

   यावेळी नाईक म्हणाले,चांदोली अभयारण्यलगत संरक्षण कुंपण  करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी अनेक वर्ष प्रलंबित आहे.अभयारण्य शेजारी असलेल्या गावांना जंगली प्राण्यापासून प्रचंड धोका व नुकसान होत आहे. वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत.याचा बंदोबस्त करण्यासाठी  मणदूर व परिसरातील गावातील नागरिकांनी वनविभाग व तहसील कार्यालयावर अनेक वेळा मोर्चे आंदोलन काढली होती. लवकरच कुंपणाचा  प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असून  लवकरच या विषयाला प्रशासकीय मान्यता मिळून हा प्रश्न मार्गी लागेल. यासाठी चांदोली अभयारण्यसाठी आवश्यक असणारा १६  किलोमीटर कुंपणाचा (सहा कोटीचा) प्रस्ताव करून वरिष्ठ विभागाकडे मान्यता साठी पाठवला असून लवकरच त्या काम मार्गी लागेल.जंगलातून वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये येऊन मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी  जंगलातून कालव्याच्या  पुलावरून येणाऱ्या प्राण्यांच्यासाठी पुलावर चार ठिकाणी गेट बसवण्यात येणार आहेत. सिद्धेश्वरवाडी - शेवताई मंदिर ते खुंदलापूर कडे जाणारा रस्ता त्याचबरोबर अभयारण्य मधील नव्याने केलेल्या रिंग रोडची  दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने वरिष्ठ विभागाकडे मान्यतेसाठी पाठवून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.जंगलातून बाहेर आलेले वन्य  प्राणी खास करून गवे जंगलाच्या दिशेने पुन्हा हुसकावून  लावण्यासाठी कोल्हापुर येथून रेस्क्यू टीम मागविण्यात आली आहे .आठ दिवसात हे गवे जंगलाच्या दिशेने हुसकावून लावणार व पर्यटनाच्या दृष्टिकोनाने जंगलामध्ये फिरण्यासाठी मोठ्या गाडीचा उपयोग होत नाही. त्यामुळे अभयारण्यलगत असणाऱ्या गावांतील युवकांनी रोजगार निर्मिती साठी घेतलेल्या गाड्यांचा पर्यटनासाठी वापर करण्यात यावा या मागणीचा लवकर वनविभाग निर्णय घेणार आहे ,अशी चर्चा अधिकाऱ्यांच्या समवेत झाली आहे.

यावेळी यशवंत दूध संघाचे संचालक के वाय भाष्टे, मंणदूरचे  माजी सरपंच वसंत पाटील, शिवाजी पाटील, मारुती पाटील ,गणपती चौगुले ,विठ्ठल चौगुले ,कोंडीबा पाटील, भगवान पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments