BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आलेल्या अनुभवातून पुस्तकं निर्मिती झाली

 


 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

  

शिराळा,ता.८:प्रशासनात काम करताना प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची सवय आणि माणसं जोडण्याबरोबर वाचायचे काम केल्याने त्यातून आलेल्या अनुभवातून पुस्तकं निर्मिती झाली.प्रशासनातील लोकांनी आलेले अनुभव लिहायला शिकले पाहिजे.मुंबईहुन गावाकडे यात्रेला येऊ इतरत्र खर्च करण्यापेक्षा त्या खर्चाचा उपयोग शाळेसाठी करून रोज अर्धा तास शाळेतील मुलांचे मोठ्याने सामूहिक वाचन कसे होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.कारण वाचनाची सवय लागल्यावर चांगली साहित्य निर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी केले.

पणुंब्रे वारूण(ता.शिराळा)येथे शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पणुंब्रे वारुण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या डोंगरी संमेलन प्रसंगी बोलत होते.

यावेळी गायकवाड म्हणाले,धरणग्रसतांच्या कामापासून माझी कारकीर्द कोल्हापूर येथून सुरु झाली.धरणग्रासतांच्या बाबतीत मी संवेदनशील आहे.शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून अनेक पुस्तके लिहिली.एक एकर सहा गुंठ्यासाठी ८६ वर्षे सुरु आलेली केसं माझ्याकडे आल्यामुळे त्यामध्ये असलेल्या मजेशीर किश्यामुळे मी लिहायला लागलो.माणसांचा अभ्यास असल्याशिवाय प्रशासनात चांगलं काम होतं नाही.माणसं वाचल्याशिवाय समाज पुढे जात नाही.

यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले,शाब्दिक अविष्कार निर्माण करण्यासाठी जवळ मोठी शब्द संपदा असावी लागते.आपल्या अभिज्यात असणाऱ्या मराठी भाषेचे ज्ञान भाषेत रूपांतर झाले तरच आपली भाषा टिकेल.त्यासाठी साहित्य संमेलनातून प्रयत्न करायला हवेत.वाचायला वय नाही वेळ लागतो.ग्रंथालयाच्या माध्यमातून ज्ञान संपदा वाढवण्याचा प्रयत्न करूया.कवी वसंत पाटील यांनी आपल्या कवितेतून धरण ग्रसतांच्या व्यथा मांडल्या आहेत.प्रकल्प व अभयारण्यग्रसतांची परिस्थिती पाहिली तर आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत.अजून ही त्यांच्या मागण्यासाठी क्रूर चेष्ठा चालवली आहे.

कवी प्रदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी गावातून साहित्य संमेलना पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली.यावेळी शालेय मुलींनी आपली लेझीम कला सदर केली.

स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी स्वागत केले.प्रास्ताविक व परिचय कवी वसंत पाटील यांनी केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,पणुंब्रे वारुणचे सरपंच बंडा पाटील,कोकरूडच्या सरपंच अनिता देशमुख,दालमिया कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार,कवी प्रदीप पाटील,उद्योजक बळीराम पाटीप,कवी सुभाष कवडे,कवयत्री मनिषा पाटील,कवी सुरेश आडके,सदाशिव नावडे,रघुनाथ डफळे,महादेव माने,किरण भावसार,सुनील यावलीकर,वैशाली वाघमोडे,नथुराम कुंभार,कुसळेवाडीच्या सरपंच कोमल मस्कर उपस्थित होते.आभार प्रकाश जाधव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments