BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वीज पडून महिलेचा मृत्यू

 



 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

   


शिराळा,ता.२५: तडवळे (ता.शिराळा) येथे शेतात गेलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील (वय ४५) या मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा अंगावर वीज  मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान  घडली.याबाबत पुतण्या सुरज महादेव पाटील यांनी शिराळा पोलिसात वर्दी  दिली. 

 या बाबत शिराळा पोलीस ठाणे व घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी आज  मंगळवार( ता.२५) रोजी सकाळी  सुनंदा पांडुरंग पाटील ह्या  लक्ष्मी संभाजी पाटील, नंदा पाटील, शांताबाई पाटील यांच्या सोबत मोरणा नदी काठी असणाऱ्या शिप्याची नाळ येथे भांगलणीसाठी गेल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास शिराळा परिसरात  विजेच्या  कडकडाट,ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा व गारांचा वळीवाचा पाऊस सुरु झाला.त्यामुळे सुनंदा आपल्या सोबत असणऱ्या महिलांच्या सह घरी निघाल्या असता पंधरा ते वीस फूट शेतातून बाहेर आल्या असता त्यांचे चप्पल शेतात राहिल्याने आणण्यासाठी गेल्या असत ते परत घेऊन माघारी येत असताना  अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यावेळी आपल्या डोळ्या समोर घडलेल्या घटनेमुळे सोबत  असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केला असता परिसरातील शेतकऱ्यांनी तिकडे धाव घेतली.पोलीस पाटील वैशाली सुभाष पाटील यांनी याबाबत शिराळा पोलिसात माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे,पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात,पोलिस हवलदार बाजीराव भोसले , इरफान मुल्ला यांनी घटनास्थळी भेट दिली.


 ग्रामसेवक प्रभावती भोसले,सरपंच प्रियांका पाटील,तलाठी सुनिल जावीर,ग्रामसेविका प्रभावती भोसले यांनी घटनेचा पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात शिराळा चे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश पाटील यांनी शवविच्छेदन केले. पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास पोलीस हवलदार बाजीराव भोसले करत आहेत.


Post a Comment

0 Comments