BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगरूळच्या ऋग्वेद खांडेकर यांची भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट अधिकारी पदी निवड



 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

    बिळाशी, ता. ३: मांगरुळ (ता. शिराळा ) येथील ऋग्वेद अंजना विजयसिंग खांडेकर यांनी प्रबळ इच्छाशक्ती आणि निर्धारपुर्वक केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर भारतीय सैन्यदलातील लेफ्टनंट या अधिकारी पदाला आँल इंडिया गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांक मिळवुन यशाला गवसणी घातली आहे.  ऋग्वेद खांडेकरने मिळवलेल्या यशाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे. त्याच्या या निवडीबद्दल आज मांगरूळ येथे त्याची गावातून मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

    वडील  विजयसिंग लक्ष्मण खांडेकर महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय छात्र सेनेत होते. त्यामुळे साहजिकच मुलाने सैनिकी सेवेत रुजू व्हावे अशी  त्यांची,अंजना व चुलते बाजीराव खांडेकर यांची  प्रबळ इच्छा होती. ऋग्वेद यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल राजारमनगर (साखराळे) येथे झाले. उच्य माध्यामिक शिक्षण विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज (इस्लामपुर) येथे झाले.  पदवी पर्यंतचे शिक्षण डॉ.आण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अग्रिकल्चरल इंजिनिअरिंग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे झाले. पदवीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सैन्य दलातील अधिकारी पदासाठी यु.पी.एस.सी.मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शनासाठी ६ महिने पुणे येथे त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर आई-वडील वास्तव्य करत असलेल्या इस्लामपुर येथील घरात राहुनच त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास पुढे चालू ठेवला. एकंदरीत तीन वर्षे अभ्यास केला. परिक्षांमध्ये यशापयश आले परंतु ते खचले नाहीत. त्यास आई वडील,चुलते व  सर्व मित्र परिवार यांची साथ मिळाली. कोणतीही विशेषतः खाजगी शिकवणी न लावता स्वयंअध्ययनाने ऋग्वेदने हे उज्वल यश मिळविले आहे.

 

" मी ठरविलेले ध्येय माझ्या भारतीय सैन्य दलातील 'लेफ्टनंट' पदाने पूर्ण झाले आहे. त्याचा माझे आई वडील,चुलते, माझे सर्व भाऊ, बहिणी,तसेच माझा सर्व खांडेकर परिवार, माझा मांगरुळ गाव,तसेच मित्रांना अभिमान वाटत आहे.ध्येयप्राप्ती मुळे मी सुध्दा आनंदी आहे. मी यापुढे भारतीय सैन्यदलात उत्तमपणे सेवा करुन माझ्या पदाला नक्कीच न्याय देईन !"


कु. ऋग्वेद अंजना विजयसिंग खांडेकर, लेफ्टनंट, भारतीय सैन्य दल.

Post a Comment

0 Comments