BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नगरपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला

 



 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

    


शिराळा,ता.११: शिराळा नगरपंचायतीच्या उत्पन्नाचा प्रमुख मुख स्त्रोत हा मालमत्ता कर आहे. शिराळा नगरपंचायत हद्दीतील ५७२१  मालमत्ताधारकांकडून २०२४-२५ या वर्षात १ कोटी ४५  लाखाची  मालमत्ता कराची मागणी आहे. ३५६७ नळपाणी  जोडण्या  असून  ७९  लाख रुपये  पाणीपट्टीची रक्कम आहे.मार्च अखेर आल्याने  वसुलीसाठी नगरपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला असून थकीत बिलापोटी ५३ जणांच्या नळ जोडण्या बंद करण्यात आल्या आहेत.  

नगरपंचायत प्रशासनाकडून २०२४-२०२५ वर्षाच्या कराच्या मागणीची देयके सर्व मालमत्ताधारकांना बजावण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. यावर्षी शंभर टक्के मालमत्ता कराचे  उद्दिष्ट नगरपंचायतीने ठेवले आहे. यासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली मोहीम हाती घेतली आहे. विशेष वसुली मोहिमेचा भाग म्हणून सर्व थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या  आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष पथकांची निर्मिती करून कर वसुलीची मोहीम सुरु  आहे. ती  वेळेवर भरण्याबाबत रिक्षाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

 सदर वसुलीसाठी विशेष पथक कार्यरत असून कार्यालयीन अधिक्षक नारायण गोसावी, उपअधिक्षक प्रकाश शिंदे, लेखापाल हणमंत कांबळे, पाणीपुरवठा अभियंता स्नेहल पन्हाळकर, बांधकाम अभियंता संजीव जाधव व प्रभाग  लिपीक गणपती इंगवले, सदानंद टिळे, आबाजी शहाणेदिवान, विजय शिंदे, संजय इंगवले, लक्ष्मण मलमे यांच्या  मार्फत कार्यवाही सुरू आहे.

थकीत मालमत्ताधारकांच्या कराच्या रकमेएवढ्या किंमतीच्या जंगम मालमत्ता जप्त करण्याची  यादी तयार असून त्यांच्या नावाचे चौकाचौकात फ्लेक्स २  दिवसात सार्वजनिक ठिकाणी लावणेत येणार आहेत. 

थकीत मालमत्ताधारकांनी घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम न भरल्यास वसुली संदर्भातील कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कारवाई टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी  थकबाकीची रक्कम व चालूची रक्कम त्वरीत जमा करावी.

 मुख्याधिकारी नितीन गाढवे (मुख्याधिकारी ,नगरपंचायत शिराळा )


Post a Comment

0 Comments