शिराळा : चिखली ता.शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात 27 मार्चला ए. आय. तंत्रज्ञान व भविष्यातील ऊस शेती विषयावर स्मार्ट शेतकरी संमेलन आयोजन केले आहे. ही माहिती संचालक विराज नाईक व कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र व नेटाफिम कंपनीच्या सहकार्याने हे स्मार्ट शेतकरी संमेलन होणार आहे. त्याचे उद्घाटक व अध्यक्षस्थान कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक भूषविणार आहेत. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरूडकर व इतर संचालक प्रमुख उपस्थित असतील. या संमेलनात नेटाफिमचे कृषी तंत्रज्ञ श्री. अरूण देशमुख हे ए. आय. प्रणालीद्वारे ठिबक सिंचन व्यवस्थापन या विषयावर तर, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृषी तज्ञ श्री. तुषार जाधव हे ए.आय. तंत्रज्ञान विष्यातील ऊस शेती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
गुरुवार ता. 27 मार्च 2025 रोजी कारखान्यावरील चिंतन मंडप येथे या संमेलनाची सकाळी साडे दहा वाजता सुरूवात होईल. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments