शिराळा,ता.२०:शिरशी (ता.शिराळा) येथील भोसले यांच्या शेतात असणाऱ्या विहिरीत पडून सुमारे २ ते ३ महिने वयाच्या डुकराच्या पिल्लाचा मृत्यू झाला. ही घटना काल सकाळी उघडकीस आली.
याबाबत घटनास्थळ व वन विभागातून समजलेली माहिती अशी,शिरशी येथील भोसले यांच्या शेतात असणाऱ्या विहिरी जवळ असणाऱ्या शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना उग्र वास आल्याने त्यांनी विहिरीत पहिले असता त्यांना डुक्कराचे पिल्लू पडलेले आढळून आले. त्यांनी याबाबत सर्जेराव भोसले यांना माहिती दिली. त्यावेळी भोसले यांनी वन विभागास कळवले.त्यावेळी वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे ,वनरक्षक स्वाती कोकरे ,दतात्रय शिंदे,वनमजूर दादा शेटके,सुभाष पाटील,शिवाजी सावंत,संतोष कदम यांच्या सह प्राणी मित्र प्रा.सुशीलकुमार गायकवाड यांच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी जाऊन भेट दिली. त्यावेळी रेस्क्यू पथकाने डुक्करास बाहेर काढले असता ते सडलेल्या अवस्थेत होते.त्याचा पंचनामा करून त्यास दफन केले. दोन वर्षा पूर्वी याच विहिरीत पडून एक डुक्कर मृत्युमुखी पडले होते.
0 Comments