शिराळा,ता.१२: मांगले (ता.शिराळा) येथे अज्ञात वाहनाने समोरुन धडक दिल्याने राजेंद्र बाबुराव चोपडे (वय ३५ ) रा,वशी (ता.वाळवा) यांचा मृत्यू झाला. याबाबत जालिंदर रंगराव चोपडे (वय ३० ) रा वशी ता. वाळवा यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्यापूर्वी घडली.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी,राजेंद्र चोपडे हे शहापुर( ता.हातकणंगले) जि.कोल्हापुर येथे त्यांच्या आई-वडीलांना भेटण्यास गेले होते.त्यांना भेटुन परत मोटरसायकलवरून मांगले गावातुन चिकुर्डे रस्त्याने वशीकडे जात असताना राजेंद्र दिवाण यांच्या शेतीजवळ आले असता त्यांना अज्ञात वाहनाने समोरुन धडक दिली. त्यामुळे डांबरी रस्त्यावर पडुन त्यांच्या डोकीस गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यू प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील करत आहेत.
0 Comments