BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शॉर्ट सर्किटमुळे डोंगराला आग





 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

   

 

शिराळा,ता.३०: तडवळे( ता.शिराळा) येथील  महारखडी येथे शॉर्ट सर्किटमुळे डोंगराला लागलेल्या आगीत डोंगरातील गवत व जनावरांच्यासाठी शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या गवताच्या गंज्या जाळून खाक झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाख हुन अधिक नुकसान झाले आहे.तर चाळीस एकरातील गवत गवत जळून खाक झाले.

शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता   महारखडी येथे डोंगराला आग लागली. ही आग लागलेली समजताच  गावातील  सुमारे  १००हुन अधिक युवकांनी  आग विझवण्यासाठी डोंगराकडे धाव घेतली.मात्र दुपारची वेळ असल्याने  ऊन आणि वाऱ्याचा झोत वाढल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.त्यामुळे  आग आटोक्यात येत नव्हती, डोंगरात अनेक  शेतकऱ्यांनी जनावरांच्यासाठी गवत काढून गंजी रचून ठेवल्या होत्या. त्या गंज्या क्षणात जळून खाक झाल्या..ती आग तडवळे कडून उपवळे, पावलेवाडी, रिळे गावांच्या हद्दीतकडे पसरली. सुमारे चाळीस एकरातील गवत जळून खाक झाल्याने झाडे झुडपे,व सरपटणारे प्राणी होरपळून गेले.

    गवत काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. गवत काढने परवडत नसताना सुद्धा शेतकऱ्यांनी जनावरांच्या साठी वर्षभर चाऱ्याची सोय म्हणून गवत काढून रचून ठेवले होते. पण डोंगराला अचानक आग लागल्याने गवत जळून खाक झाले. तडवळे येथील  संजय पाटील, सदाशिव पाटील, रंगराव पाटील, विनायक पाटील यांच्या सह १० ते २५ शेतकऱ्यांचे गवत जळाले. सहा तासानंतर आग आटोक्यात आली पण तोपर्यंत सर्व डोंगर जळून खाक झाले होते.

नुकसान भरपाई मिळावी

विद्युत वितरणची लाईन या महारखडी येथून गेली आहे.त्या लाइनचे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.या आगीत अनेक शेतकऱ्यांचे काढलेले गवत जळून खाक झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना जनावरांना काय खायला घालायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळावी.

सुभाष पाटील (ग्रामस्थ,तडवळे)

Post a Comment

0 Comments