शिराळा: शिराळा तालुक्यातील दुर्लक्षित असलेल्या ठिकाणी जंगलामध्ये राहुन सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन दारू बंदी निमित्त सत्यनारायणाची महापूजा व अखंड हरिनाम सप्ताह , ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न करून संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण करण्याचे काम धनगरवाडा (मणदूर) येथील नागरिकांनी केले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले.
धनगरवाडा (मणदूर) (ता.शिराळा ) येथे दारूबंदी निमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा, अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या निमिताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नाईक म्हणाले, मणदूर पैकी धनगरवाडा येथील नागरिकांनी प्रचंड मोठ्या हाल अपेष्टा व संघर्ष सहन करत आत्तापर्यंतचे आपले जीवनमान घालवले आहे. या गावातील नागरिकांनी गेले पंचवीस वर्षे दारूबंदी करून इतरांचे पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. याचे औचित्य साधून गेले पंचवीस वर्षे सत्यनारायणाची महापूजा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न करत आहेत. आपल्या पूर्वजांची प्रथा आजच्या तरुणांनी कायमस्वरूपी पुढे चालू ठेवली आहे. पूर्वीच्या जुन्या जाणकार लोकांनी हा अभिनव उपक्रम राबवून एक आध्यात्मिक निर्धाराची लावलेली पणती या पुढील काळात हि तरुण मंडळी निष्ठेने, आपुलकीने व तेवढ्याच ताकतीने ती तेवत ठेवतील .यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आपण अखंडपणे आध्यात्मिक परंपरा जपत ठेवली असल्यामुळे यापुढील काळात आपला असणारा संघर्षमय वनवास संपणार आहे. थोड्याच दिवसात आपल्याला चांगला शुभ संदेश मिळेल.असेच कार्य आपल्याकडून पिढ्यानपिढ्या टिकवून राहावे.
यावेळी मणदुरचे माजी सरपंच वसंत पाटील ,सेवा सोसायटीचे अध्यक्ष जी. के. पाटील, बाबुराव डोईफोडे, नथुराम डोईफोडे,रामचंद्र डोईफोडे, तुकाराम डोईफोडे ,विठ्ठल शेळके,रामचंद्र शेळके, तुकाराम झोरे,विठ्ठल झोरे उपस्थित होते.
0 Comments