शिराळा,ता.८ :पुनवत (ता.शिराळा) येथील भगवान मारूती शेळके(वय ४५ ) यांचा वारणा नदीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत पोलीस पाटील बाबासो पांडूरंग वरेकर (वय ४४)रा. पुनवत यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली .ही घटना आज शनिवारी सकाळी पावणे दहा वाजण्यापूर्वी उघडकीस आली.
याबाबत शिराळा पोलस व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, दीपक शेळके यांनी वारणा नदीत पुनवत गौंड येथे एक पुरुष जातीचे प्रेत तरंगत असल्याची माहिती पोलीस पाटील बाबासो वरेकर यांना दिली. त्यावेळी पोलीस पाटील वरेकर व सरपंच नानासो शेळके यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ते भगवान शेळके यांचे प्रेत असल्याचे खात्री पटली. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली .त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात,पोलीस हवलदार सुनील पेठकर,अमर जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस हवलदार सुनील पेठकर करत आहेत.
0 Comments