शिराळा,ता.३:टाकवे ( ता.शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या शाळूच्या शेतात अज्ञात ३५ ते ४० वयाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे.सदर घटना सोमवार (ता.३) रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास समजली.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा पर्यंत शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
याबाबत शिराळा पोलीस व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, शाळेच्या पश्चिम बाजूला शाळूचे शेत आहे याठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी असते. सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी त्या परिसरातून येत असता त्यांना शेताच्या बांधावर प्राण्यांनी ओढून आणलेले प्रेत दिसले.ते सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाचा काही भागाचे प्राण्यांनी लचके तोडल्याचे दिसून आले आहे. याबाबत पोलीस पाटील विनोद सुतार यांनी शिराळा पोलिसांना माहिती दिली.त्यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे , महेश गायकवाड , सुनील पेटकर, अरुण मामलेकर यांच्यासह पोलीस पथकाने दाखल झाले आहे. रात्री उशिरा पर्यंत परिसरात संशयास्पद काही आढळते काय याची माहिती पोलीस घेत होते..
ज्या शाळूच्या शेतात मृतदेह आढळून आला त्या शेतापासून काही अंतरावर ऊस आहे.त्या ठिकाणी मळी टाकली असल्याने त्या मळीचा वास येत होता.त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या मृतदेहाचा वास लोकांना आला नाही.मळीचा वास असावा म्हणून लोकांनी तिकडे दुर्लक्ष केले असावे असा चर्चा गावात सुरु आहे.
0 Comments