शिराळा :येळापुर (ता. शिराळा) येथे कराड -शेडगेवाडी राज्य मार्गावरील बस्थानक चौक येथे दुचाकी आणि डंपर यांच्या झालेल्या धडकेत मोटार सायकल वरील सादिक नारायण यादव (वय ४५) आणि किसन विष्णु यादव (वय ३५) रा.गवळेवाडी हे दोन युवक जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद कोकरुड पोलिसात झाली आहे. अपघात प्रकरणी डंपर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही घटना आज बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली . घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,गवळेवाडी येथील सादिक नारायण यादव व किसन विष्णु यादव हे आज बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास गवळेवाडीहुन दुचाकीने शेडगेवाडीकडे जात होते. तर डांबर वाहतूक करणारा डंपर डांबर खडी आणण्यासाठी शिराळाकडे निघाला होता.दरम्यान येळापूर बस स्थानकावरील वाकुर्डे फाट्याकडे वळत असताना डंपर व दुचाकीची धडक होऊन सादिक यादव आणि किसन यादव डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांचे सह कोकरुड पोलिसानी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला .
0 Comments