BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खून प्रकरणी मंगेश ला पोलीस कोठडी





 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

   

शिराळा : भारत सरकारच्या 

 शिराळा : मांगले (ता.शिराळा)  येथे  चारित्र्याच्या संशयावरून  पत्नी प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिल्याने या  प्रकरणी अटक केलेल्या पती  मंगेश चंद्रकांत कांबळे (३५ )  यास शिराळा न्यायालयात हजर केले असता पाच  दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे..

  काल गुरुवारी सकाळी मंगेशची आई व भाऊ देववाडी येथे नातेवाईकांच्या घरी दु:खद घटना घडल्याने गेले होते.  दहाच्या दरम्यान मंगेश व प्राजक्तामध्ये घरी वाद झाल्याने  मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने  गळा आवळून खून केला.त्या नंतर प्राजक्ताचा मृतदेह विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत घालून पेटीत झाकून ठेवली होती.खोलीला कुलूप लावले.नंतर मंगेशने   भाऊ निलेशला  फोन करून मी शिराळ्याला जाणार आहे. गाडी घेऊन ये असा निरोप दिला.  निलेश देववाडीतून मांगले गावात आल्यानंतर मंगेशने त्याच्याकडून  गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला. दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता. त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झाले विचारले असता त्याने   मम्मी ,पप्पांचे दोघांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर निलेशने मंगेश ला फोन करून कुठे आहेस असे विचारले,त्यावेळी  त्याने मी शिराळा येथील  गोरक्षनाथ मंदिरा जवळ असल्याचे सांगितले. त्यानंतर निलेशने देववाडी येथील येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलवून घेतले. 


मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळच थांब आम्ही येतो म्हणून सांगितले. त्यानंतर  गोरक्षनाथ मंदिराजवळ जावून  सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्यांने खून  केल्याचे  सांगितले .त्यानंतर या तिघांनीही त्याला आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असे सांगितले. त्यानंतर तो स्वतः शिराळा  पोलिसात हजर झाला. प्राजक्ता व मंगेश यांचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला आहे.त्यांचे मुळगाव कोकरूड आहे.याबाबत मयत प्राजक्ताची आई रंजना अर्जुन चांदणे (वय ४५) रा. कोकरूड यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे.अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत. 


Post a Comment

0 Comments