BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या मृतदेहाची ओळख पटली पण ....

 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 


Running Text
जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .
शिराळा,ता.४:टाकवे (ता.शिराळा) येथील अज्ञात ४० ते ५० वयाचा सडलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे.सादर व्यक्ती हा कराड येथून स्लॅब टाकण्यासाठी आलेला कामगार असून त्यास बबलू नावाने ओळखले जात होते.मात्र त्याचे खरे नाव व गाव कोणते याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.त्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.तो परराज्यातील असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. 



 टाकवे येथील जिल्हा परिषद शाळेच्या पश्चिम बाजूला सुभाष रामचंद्र पाटील यांचे शाळूचे शेत आहे. याठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी असते. काल सोमवारी (ता.३ ) रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी त्या परिसरातून येत असता त्यांना शेताच्या बांधावर प्राण्यांनी ओढून आणलेला मृतदेह आढळून आला.तो सडलेल्या अवस्थेत होता.त्याच्या काही भागाचे प्राण्यांनी लचके तोडलेले होते.याबाबत पोलीस पाटील विनोद सुतार यांनी शिराळा पोलिसांना माहिती दिली.त्यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे ,महेश गायकवाड,सुनील पेटकर,अरुण मामलेकर यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड होते.


 त्यावेळी पोलिसांनी रात्री अंधारात त्या शेतामध्ये बारकाईने शोध घेतला असता त्यांना टॉवेल, टी-शर्ट, हातामध्ये असलेला ग्लोज , चप्पल असे साहित्य मिळून आले. त्या वरून चौकशी केली असता टाकवे येथील एका घरावरती स्लॅब टाकण्यासाठी कराड येथून कामगार आले होते.स्लॅब टाकून कामगार परत जात असताना त्यांना एक कामगार मिळून आला नाही. त्याची वाट न पाहता इतर कामगार कराडला निघून गेले. त्यांच्या मुकादम याने घर मालक यांना आमचा एक माणूस आला तर त्याला शंभर रुपये देऊन टमटम मध्ये बसून कराड येथे पाठवून द्या असे सांगितल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्या वरून पोलिसांनी मुकादमाशी संपर्क साधला असता .टॉवेल, टी-शर्ट, हातामध्ये असलेला ग्लोज ,चप्पल या साहित्यावरून तो आपल्या सोबत आलेला कामगार बबलू असल्याचे सांगितेल. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उदय पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments