माणसाकडे जिद्द ,चिकाटी,सहनशीलता आणि स्वतःचा आत्मविश्वास असला की तो आपणाला हवे असणारे उद्दिष्ट साध्य करतो हे कृतीतून मांगरूळ येथील ऋग्वेद खांडेकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे.१५ वेळा मुलाखतीत पाच सहा मार्कांनी अपयश आले तरी खचून न जाता अथवा आपला मार्ग न बदलता त्याच वाटेने जाऊन अखेर भारतीय सैन्यदलातील लेफ्टनंट या अधिकारी पदाला आॅल इंडिया गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांक मिळवून यशाला गवसणी घातली आहे.त्याच्या या संघर्षमय यशा बाबत त्याच्याशी साधेलेला संवाद त्याने दिलेल्या महत्वाच्या टिप्स .
शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असला तरी ग्रामीण भागतील मुलांच्यात गुणवत्ता आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे. अनेक विध्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकले आहेत. ऋग्वेद ने मिळवलेले यश हे त्याच्यासाठी कष्टप्राय असले तरी इतरांच्यासाठी मात्र ते प्रेरणादायी उर्जेचा स्त्रोत आहे.त्याच्या या संघर्ष गाथेने स्पर्धा स्पर्धा परीक्षेत अजून ही अपयशी ठरणाऱ्या अनेकांना यातून प्रेरणा मिळेल.त्यांच्यात पुन्हा आपल्या ध्येयपूर्तीची एक वेगळी उर्ज्जा निर्माण होईल. ऋग्वेदचे वडील विजयसिंग खांडेकर हे शिक्षक तर आई जनउत्कर्ष पतसंस्थेत मुख्यव्यवस्थापिका म्हणून काम करत आहेत.मुळचे हे शेतकरी कुटुंब.त्यांचे मुळगाव शिराळा तालुक्यातील मांगरूळ आहे.मुलाच्या शिक्षणासाठी ते इस्लामपूर येथे राहत आहेत. त्याचे वडील महाविद्यालयात असताना एनसीसी करत होते.त्यामुळे त्यांना या क्षेत्रात आवड होती.त्यांना ते शक्य झाले नाही.त्यामुळे आपल्या मुलाने देश सेवा करावी अशी त्यांची अपेक्षा होती.शिवाय आपल्या नातवाच्या हातून देश सेवा व्हावी अशी त्याचे आजोबा आबा दादा यांची इच्छा होती.योगायोगाने ऋग्वेदची ही आपण देश सेवा करायची इच्छा होती. मात्र केवळ इच्छा व्यक्त करून ती होत नाही,त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागते याची त्याला पुसटशी कल्पना नव्हती. केवळ इच्छाशक्तीवर अवलंबून न राहता त्याने पहिल्यांदा हातात काहीतरी शैक्षणिक पात्रत असावी जेणे करून कदाचित आपण स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरलो तरी आपले शिक्षण व्यर्थ जाणार नाही.त्या शैक्षणिक पात्रतेच्या जोरावर आपण कुठेतरी नोकरी करू असा बी टेक ॲग्रीच्या माध्यमातून शैक्षणिक पाया भक्कम केला. नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी ठेवली. ऋग्वेद यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल राजारमनगर (साखराळे) येथे झाले. उच्य माध्यामिक शिक्षण विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज (इस्लामपुर) येथे झाले. पदवी पर्यंतचे शिक्षण डॉ.आण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अग्रिकल्चरल इंजिनिअरिंग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे झाले. पदवी पर्यंत अपयश कधीच माहित नव्हते.मात्र बी टेक ॲग्री जुलै २०२१ मध्ये पुर्ण झाल्यानंतर सैन्य दलातील अधिकारी पदासाठी यु.पी.एस.सी.मार्फत घेतल्या जाणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा व वायुदल सेवा या स्पर्धा परिक्षेच्या मार्गदर्शनासाठी ६ महिने पुणे येथे अभ्यास केला.
स्पर्धा परीक्षेत उतरल्यावर अनेकवेळा दोन हजार किलोमीटर जाऊन ही अपयश येत होतं. त्याच्या सोबत असणऱ्या काही मित्रांची निवड व्हायची त्यावेळी मन निराश व्हायचं .काहीवेळा आपला मार्ग चुकतोय की काय असे वाटत होते. १५ वेळा मुलाखतीत पाच सहा मार्कांनी अपयश आले तरी न खचता पुन्हा त्याच जोमाने प्रयत्न सुरु ठेवले. त्यासाठी घरातून आई वडिलांची खंबीर साथ होती. ते तू अपयशी होत नसून यशच्या जवळ पोहचत असल्याची त्याला सतत जाणीव करून देत होते.माझी सेवानिवृत्ती अजून चार वर्षे आहे.त्यामुळे तुझ्या हातात अजून चार वर्षे आहेत असे वडील आवर्जून सांगत धीर द्याचे त्यामुळे तो खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास करत होता. पुणे येथे मार्गदर्शनासाठी ६ महिने असताना आपणाला काय करावे लागणार याची खात्री पटल्याने तिथे न राहत घरीच इस्लामपूर येथे अडीच वर्षे अभ्यास केला. त्यासाठी दररोज ६ ते ७ तास अभ्यास व गट चर्चा करत असत. नियमित सायंकाळी जिम मध्ये दिड तास व्यायाम सुरु होता. यापुर्वी भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंटपदी निवड झालेले मित्र, सहअध्यायी मित्र, चुलते बाजीराव खांडेकर, आई वडिलांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
0 Comments