शिराळा,ता.४:विक्रेत्यांनी युरिया लिंकिंगवर व ज्यादा दराने विकल्याचे आढळून आल्यास त्या विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्यात येईल असा इशारा तालुका कृषी अधिकारी किरण पवार यांनी दिला.
शिराळा येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आयोजित केलेल्या खत ,कीटकनाशके,बियाणे परवानाधारक विक्रेते यांच्या बैठकित बोलत होते.यावेळी मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिंदे व निलेश अडसुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवार म्हणाले, सर्व परवानधारक विक्रेत्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके विक्री करताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.कीटकनाशके आधीनियम १९६८ व १९७१, बियाणे अधिनियम १९६६ व ६८ ,खत नियंत्रण आदेश १९८५ ,अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ यातील कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खात्री सर्व विक्रेत्यांनी करावी.युरिया लिंकिंगवर व ज्यादा विकल्यास संबंधित विक्रेत्यावर परवाना रद्द केला जाईल.
स्वागत व प्रास्ताविक निलेश अडसूळ यांनी केले.विक्रेते उमेश कुलकर्णी, युवराज नांगरे,कुणाल पाटील,विजय पाटील,राम पवार,अरविंद पाटील,सोमनाथ पाटील,बाळासाहेब शिंदे यांच्यासह कृषी सहायक व कृषी उपस्थित होते. आभार अरविंद शिंदे यांनी मानले.
.
0 Comments