BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सात हजार स्क्वेअर फुटाच्या रांगोळीचा लोकार्पण सोहळा संपन्न






 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

    

शिराळा,ता.११:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्ताने शिराळा भुईकोट किल्ला येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या रेखाटण्यात आलेल्या भव्य अशा सात हजार स्क्वेअर फुटाच्या रांगोळीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी निनाईदेवी शिक्षण संस्थेच्या अॅड रेणुकादेवी देशमुख,माजी जिल्हापरिषद सदस्य  संपतराव देशमुख, भाजपा मंडल अध्यक्ष हणमंतराव पाटील,सुखदेव पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, रणजितसिंह नाईक,सम्राट शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

   यावेळी रेणुकादेवी देशमुख म्हणाल्या , शिराळा येथील भुईकोट किल्ल्यास  ऐतिहासिक महत्त्व आहे. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा  एकमेव प्रयत्न झाला. या ठिकाणी संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून मार्गी लागेल. शिराळासह व शिराळा पंचक्रोशितील हजारो मावळ्यांची व जनतेची ही मागणी पूर्ण होईल.शिराळ्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरती  भव्य दिव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे.अशा पद्धतीने शिराळा व सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच ही रांगोळी रेखाटण्यात आली आहे. ही रांगोळी कांदे येथील  रांगोळी कलाकार सुनील कुंभार यांनी रेखाटली आहे. आज ११ पासून  १६  मार्च पर्यत रांगोळी सर्वांच्यासाठी पाहण्यास  खुली राहणार आहे.तरी याचा लाभ घ्यावा सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. 

        यावेळी शिराळा शहर भाजपा अध्यक्ष कुलदीप निकम, पी.जी. शिंदे, बसवेश्वर शेटे,शुभम देशमुख, प्रशांत कुंभार,संतोष इंगवले,अशोक गायकवाड, प्रदीप पाटील, महादेव गायकवाड, विनोद पाटील, मोहन जरांगे, अभिजित यादव,अमोल काळे, रणजित कदम,शाहु निकम उपस्थित होते.


ही रांगोळी १०० x ७० फुट म्हणजे सात हजार स्क्वेअर फुटाची असून त्यासाठी सुमारे दीड टन रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.यासाठी मला ३५ तास लागले असून  १८ प्रकारच्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.

सुनील कुंभार (रांगोळीकार ) 


 

Post a Comment

0 Comments