शिराळा,ता.१०:राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर वारणा डावा कालवा कामासाठी २६ कोटी रुपयेचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले,राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री,वित्तमंत्री अजितदादा पवार,जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे विकास महामंडळ,राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित कामांसाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.तर वारणा डावा कालव्यावरील प्रलंबित असणाऱ्या कामासाठी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीमुळे दोन्ही योजनाच्या कामांना गती मिळणार आहे.दोन्ही योजनांच्या उर्वरित कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी मी केली होती.ही मागणी मान्य झाली आहे.
0 Comments