कराड: कृष्णा कोयनेच्या संगमावर वसलेल्या व यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराड या शिक्षण नगरीत श्रीमती सिंधुताई शिक्षण प्रसारक संस्थेच्या विद्यानगर येथील ब्रिलियंट अकॅडमी ची सुरवात सन २०१५ रोजी मोजकेच विद्यार्थी घेवून झाली.तीच ही कराड नागरी. येथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा गरूड भरारी घेणार हे ओळखूनच संस्थेच्या संचालिका रूपाली पाटील यांनी अॅकॅडमी चे एका नामांकित ज्युनियर कॉलेज रूपांतर करून शिक्षणाची गंगा सांगली आणि सातारा जिल्ह्यात वाहती केले. त्याचा उपयोग आज ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरिबांच्या मुलांना होत आहे. ही सगळी किमया रूपाली पाटील या शैक्षणिक ध्येयवेड्यापणामुळे शक्य होत आहे.मनात आणले तर एक महिला काय करू शकते हे रुपाली पाटील यांनी दाखवून दिले आहे.अशा या शैक्षणिक क्रांतीने झपाटलेल्या रुपाली पाटील यांच्या कार्यकर्तुत्वाचा जागतिक महिला दिनानिमित्ताने घेतलेला आढावा ....
विद्यार्थी घडविणे हेच ध्येय
एनसीआरटी पॅटर्न नुसार अध्यापन केल्याशिवाय विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत चमकू शकत नाहीत .हे लक्षात घेऊन त्यांनी प्रथम क्लासेस व २०१९ पासून ज्युनियर कॉलेजची स्थापना करून अनेक विद्यार्थी घडविले. या ठिकाणी अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन व अॅडव्हान्स, व्हीआयटी, एलपीयू, मणिपाल, बीटसॅट, ट्रिपल आयआयटी ई, वैद्यकीय प्रवेशासाठी नीट, आर्किटेक्चर मधील करियरसाठी जेईई पेपर २, नाटा, युसीड, एनआयडी ई. तसेच डिफेन्स मधील प्रवेशासाठी एनडीए, रिसर्च क्षेत्रातील प्रवेशासाठी आयसर , नेस्ट, नॅनो सायन्स ई परीक्षेसोबत, इतरही काही एनसीएचएम, आय एम यू , सीयूईटी प्रवेश परीक्षांची देखील तयारी होते, केवळ तयारी होतेच असे नाही तर मागील ६ वर्षापासून जेईई पेपर २ या परीक्षेत सातारा जिल्हा प्रथम देणारी , दरवर्षी जेईई मेन परीक्षेत ९९ पर्सेंटाईल च्या पुढे निकाल दिले असून २०२५ चा जेईई या परीक्षेत ९९.९३३ पर्सेंटाईल सह सातारा जिल्हा टॉपर देणारी ही अकॅडमी आहे. तसेच नीट या परीक्षेत ६९० पेक्षा जास्त गुण मिळवून देणारी अकॅडमी आहे. एनडीए परीक्षेत देखील येथील विद्यार्थी पार्थ जामदार व तेजस दाभाडे या वर्षी उत्तीर्ण झाले. एलपीयू परीक्षेत ऑलइंडिया रँक ५, ६, १०,१५, १६ मिळवणारा विद्यार्थी ब्रिलियंटचा आहे.
भरघोस स्कॉलरशिप मिळवून देणेची सोय
या वर्षी केंद्रशासनाची विशेष प्रवर्गासाठी असणारी प्रत्येकी १ लाख २० हजार स्कॉलरशिप मिळवून दिली आहे. ही स्कॉलरशिप आदेश खांडेकर, आदिती मदने, अनिरुद्ध जिरंगे, हर्षदा पवार, प्रसाद जरग, सिफा शिकलगार, सोनम यादव या विद्यार्थ्याना मिळाली आहे. त्यासाठी ब्रिलियंटच्या प्रशासनाने सतत पाठपुरावा करून, वेळोवेळी कागदपत्रे देऊन प्रयत्न केला आहे.
ब्रिलियंट अॅकॅडमीमध्ये प्रवेश म्हणजे आपल्या पाल्यांचे करिअर उज्ज्वल हे निश्चित.
प्रत्येक बॅच पूर्वी ब्रिज कोर्स द्वारे एन सी ई आर टी पॅटर्न प्रमाणे पुढील शिक्षणाचा पाया भक्कम करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. १०वी पर्यंत चे शिक्षण विविध बोर्ड मधून पूर्ण करणारे विद्यार्थी ११ वी १२ वी मध्ये समपातळीवर येतात पुढील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक असते .ही प्रवेश परिक्षा संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी एकच आहे. ज्युनियर कॉलेज च्या या २ वर्षात दर्जेदार शिक्षण देणारी व परिपूर्ण तयारी करवून घेणारी, विद्यार्थी वर्तणूकीवर लक्ष, मोबाईलच्या वापरावर निर्बंध व त्याची मानसिकता समजून घेऊन योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व आत्मविश्वास निर्मिती द्वारे उत्कृष्ट निकाल देणे शक्य आहे. हे ओळखून त्यांनी वेळीच दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिस्त व विविध क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन करवून अनेक विद्यार्थी घडवले आहेत.
ब्रिलीयंट अॅकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करणाऱ्या रुपाली पाटील
एनसीईआरटी पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा पाया भक्कम करून घेण्यासाठी ब्रिलियंट क्लासेस च्या माध्यमातून आठवी ते दहावीपर्यंत जेईई व नीट फाउंडेशन, ओलंपियाड, होमी भाभा, स्कॉलरशिप,मंथन,बीडीएस ई. ची तयारी करवून घेण्यास २०२४ मध्ये सुरुवात केली व ८ विद्यार्थी पहिल्याच वर्षी एनएमएमएस ही परीक्षा पास झाले व स्कॉलरशिप या परीक्षेत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व ५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले,या वर्षी ९ वी चे २७ विद्यार्थी होमी भाभा स्टेज १ परीक्षा पास झाले व स्टेज २ परीक्षा १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून स्टेज ३ परीक्षेची तयारी करत आहेत येत्या शैक्षणिक वर्षापासून ६ वी पासून वर्ग सुरू होत आहेत .
मोफत जेईई व रिपीटर बॅच
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या ठिकाणी जेईई व नीट, रिपीटर बॅचेस अगदी मोफत पणे शिकवण्याची सोय देखील आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचे भवितव्य ब्रिलियंटवर सोपवून पालकांनी निश्चित व्हावे.
0 Comments