शिराळा,ता.३०: एसटीला अनन्य साधारण महत्व असून ते आपणाला अबाधित राखून त्यास गत वैभव मिळवून दिले पाहिजे .शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असल्याने वाडीवस्तीवर जाण्यासाठी मीन बस ची गरज आहे.त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे शिराळा आगाराला मिळालेल्या नवीन दहा एसटी बसच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.यावेळी देशमुख म्हणाले, शिराळा आगार अडचणीत असताना खिंड लढवण्याचे काम चालक -वाहक यांनी केले. नवीन गाड्या आल्या म्हणून असणाऱ्या गाड्या कमी करू नका. आणखी गाड्या देऊ. स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून या आगाराची निर्मिती झाली आहे.लोकांना चांगली सेवा मिळण्यासाठी चालक व वाहक वाढवा. कोविडं काळातील ज्यांनी चालक व वाहन म्हणून सेवा दिली त्यांना आता संधी द्या.वाडी वस्तीवर मिनी बस सुरु झाल्यास त्याचा फायदा शालेय मुलांना व वृद्धांना होईल. गाड्या वेळेत सोडा. आगाराला शुद्ध पाणी देऊ. चालक वाहकांचे विश्रामगृह चांगले करा. शिराळा नागपंचमीला गत वैभव मिळण्यासाठी सामुहिक प्रयत्न करूया .
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, सेवानिवृत्तीमुळे आगारात चालक- वाहक कमी झाले आहेत.त्या रिक्त जागा भरून समतोल साधून प्रवाशांना चांगली सेवा द्यावी.ग्रामीण भागातील लोकांना चांगली सेवा द्या.
आमदार सदाभाऊ खोत म्हणाले,एसटी ग्रामीण भागाचे वैभव आणि रक्त वाहिनी आहे. चालक व वाहक ही एसटीची दोन चाके आहेत.त्याच्यावर सर्व अवलंबून आहे.एसटीला वाहक चालक राबत असल्याने एसटीला उत्पन्न मिळत आहे.पाच वर्षेत एसटीत पारदर्शक कारभारा झाल्यास ती नफ्यात येईल.मात्र प्रत्येकांनीतिला लुबाडण्याचे काम केले. एसटीचांगली चालण्यासाठी येथे सुरु झालेला भ्रष्टाचार हाटवावा लागेल.चाल वाहकाला जपले तर एसटीला गतवैभव प्राप्त होईल.
सम्राट महाडिक म्हणाले, नवीन एसटी मिळाली असली तरी ग्रामीण भागासाठी इलेक्ट्रॉनिक बसेस मिळाल्या पाहिजेत.रुग्णांना व शालेय मुलांना मोफत एसटी सेवा मिळाली तर त्यांना चांगला लाभ होईल.
प्रारंभी आमदार सत्यजित देशमुख ,आमदार सदाभाऊ खोत,माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक ,सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीत दहा नवीन गाड्यांचे पूजन करून लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
संभाजी नलवडे, कैलास देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत व प्रास्तविक आगार प्रमुख धन्वंतरी ताटे यांनी केले.
यावेळी संपतराव देशमुख,रणजितसिंह नाईक,केदार नलवडे,के.डी.पाटील,सुखदेव पाटील,पृथ्वीसिंग नाईक,जयसिंगराव शिंदे, हणमंतराव पाटील, कुलदीप निकम, बसवेश्वर शेटे, राजू पाटील, निलेश आवटे ,चंद्रकांत पाटील, चेतन हसबनीस,वैभवी कुलकर्णी, अनिता धस, डॉ.योगिता माने,डॉ. शैलेश माने, सम्राट शिंदे, प्रतापराव यादव, सत्यजित कदम, प्रवीण डोंगरे,सतीश पाटील, जयंत पाटील, अभिजित लाड, मयुरी जांगळे,शरद धनवडे,सतीश सुतार उपस्थित होते.शरद शेळके यांनी सूत्रसंचालन केले. विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी आभार मानले .
नवीन गाड्यांना देवांची नावे
शिराळा आगारात नवीन दहा गाड्या आल्या असून त्या गाडीवर नागीण एक्स्प्रेस, निनाईदेवी एक्स्प्रेस, अंबामाता एक्स्प्रेस, गोरक्षनाथ एक्स्प्रेस अशी देवांची नावे देण्यात आली आहे. लोकार्पण सोहळ्या नंतर आमदार देशमुख यांनी एसटी बसून अंबामाता व गोरखनाथ मंदिराला भेट दिली.गोरक्षनाथ मंदिरात मठाधीपती पीर पारसनाथ महाराज यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.
नाईक यांचा देशमुखांना कानमंत्र
तुम्ही विधानसभेत जास्त मागा.जोरदार आवाज उठवा.त्यावेळी तुम्हाला काहीतरी मिळते.कसे बोलावे हे सदाभाऊ यांच्याकडून शिका असा कानमंत्र माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आमदार सत्यजित देशमुख यांना दिला.देशमुख यांनी शिराळा विधानसभा मतदार संघाचे प्रश्न विधानसभेत मांडल्याबद्दल त्यांचे कौतुक नाईक यांनी केले. मात्र तिथे बोलत असताना आपल्याकडून कधी अवास्तव आणि वायफळ बोलले जाऊन नये याची दक्षता घेण्याचा मौलिक सल्ला नाईक यांनी देशमुख यांना दिला.
0 Comments