कराड :राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या विद्यार्थ्यांनी (एल पी यु) लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ७ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कॉलेजच्या प्रिन्सिपल, शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. इंजिनीयरिंग व मेडिकल क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध परीक्षेत यश संपादित करवून देऊन भारतातील सर्वोच्च कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देणारी कराड मधील हि संस्था आहे.
उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ब्रिलियंट च्या विद्यार्थ्यांनी फक्त कराड येथील एकाच शाखेतून अतिशय घवघवीत यश संपादन केले आहे. अंकलेश मलबिंग राजपिरोहित याने परीक्षेत ३८८गुणांसह देशात ७ वा आला आहे अवंतिका किशोर पिसे हिने देखील ३८८ गुण प्राप्त केले असून दोघांचे गुण सामान असून मॅथ्स विषयातील गुणांनुसार देशातील रैंक मध्ये केल्या जाणाऱ्या फरकानुसार तीला देशात १० वा क्रमांक मिळाला आहे दोघेही ७०% स्कॉलरशिप साठी पात्र आहेत. आर्यन मोहन पाटील व सुमित राज चंद्रकांत पाटील यांनी ३८४ गुण प्राप्त केले असूनत्यांची देशातील रैंक ६१ आहे. कुंभार काजल ज्योतीराम हिला ३८० गुण प्राप्त झाले असून तिची देशातील रैंक ८७ आहे. अशाप्रकारे एकूण ५६ विद्यार्थी कॅटेगरी अ, १० विद्यार्थी कॅटेगरी ब व ३ विद्यार्थी कॅटेगरी क नुसार अनुक्रमे ७०% ५० % व ४०% स्कॉलरशिप साठी पात्र आहेत. सर्व विद्यार्थी यामध्ये प्रवेशासाठी पात्र आहेत. विदयार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.दहावीची परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांसाठी ब्रिज कोर्से अंतर्गत जेईई, नीट, एनडीए, आर्किटेक्चर, डिफेन्स रिसर्च ई परीक्षांच्या तयारीसाठी एन.सी ई आर टी पॅटर्न नुसार 11 वी चे वर्ग 1 एप्रिल पासून सुरू होत आहेत तसेच ब्रिलियंट क्लास कराड अंतर्गत जेईई, नीट, एनडीए, आर्किटेक्चर, रिसर्च क्षेत्रात स्टुडंट्स चा पाय पक्का करून देण्यासाठी ६ वी ते १० वी फौंडेशन स्कुल चे वर्ग १५ एप्रिल पासून सुरू होत आहेत, पालकांनी या संधीचा लाभ पाल्यांना मिळवून द्यावा असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
0 Comments