BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास’ची गाळप क्षमता प्रतिदिनी दहा हजार टन करण्याचे उद्दिष्ट



आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text
जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 शिराळा,ता.३:येत्या दोन वर्षात ‘विश्वास’ कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी दहा हजार टन करण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने आधुनिकीकरण हाती घेतले असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले. 

चिखली (ता.शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखान्याच्या सन २०२४-२५ गळीत हंगामाच्या सांगता समारंभात बोलत होते. 

ते म्हणाले,उसाची उपलब्धता पाहता आता साखर कारखानदारीचे हंगाम १०० ते १२० दिवसापर्यंत चालतील असेल चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे कमी कालावधित जास्तीचे गाळप करणे,हा एकमेव पर्याय कारखानदारापुढे राहील.त्याचा विचार करून यंत्रणेचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे.पुढील वर्षे प्रतिदिनी एकूण साडेसात हजार टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.त्यापैकी पाच ते साडेपाच हजार टनाच्या गाळपातून साखर निर्मिती तर,२ हजार टनाच्या गाळपातून इथेनॉल किंवा ई.एन.ए.निर्मिती होईल. त्यासाठी आसवनी प्रकल्पाचा बॉयलर व टर्बाइन वेगळे राहील. 

अधआगामी दोन वर्षात गाळप क्षमता १० हजार टनापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.त्यासाठी आवश्यक यंत्रणेचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे. सह विजनिमिर्ती प्रकल्पाची क्षमता वाढ करून २२ मेगावॉट निर्मिती होत आहे.आसवनी प्रकल्प क्षमता प्रतिदिनी १लाख ५ हजार लीटरवर नेली आहे.ती भविष्यात १लाख ८० हजारापर्यंत नेण्याचा मानस आहे.कारखान्याच्या प्रगतीत ऊस उत्पादक,सभासद,तोडणी व मजूर तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. पुढील काळातही ते कायम ठेवावे. 

प्रारंभी संचालक विराज नाईक यांच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले. सौ.जोती व संचालक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते साखर पोती पूजन व महापूजा संपन्न झाली.स्वागत व प्रास्ताविक शेती समितीचे अध्यक्ष संचालक शिवाजी पाटील यांनी केले.यानंतर तोडणी,वाहतूकदार,ठेकेदार यांचा सत्कार अध्यक्ष नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सुरेश चव्हाण, विश्वास कदम,संभाजी पाटील,विष्णू पाटील,बाबासो पाटील, बिरूदेव आमरे,सुहास घोडे-पाटील,यशवंत दळवी,यशवंत निकम, कोंडिबा चौगुले,तुकाराम पाटील,आनंदा पाटील,कार्यकारी संचालक अमोल पाटील,कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील,सचिव सचिन पाटील,मुख्य मिश्रक ए.एस.पाटील,इतर खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.संचालक विश्वास पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments