कोल्हापूर : सामाजिक सेवाभावी संस्था आदर्श फाऊंडेशन यांच्या वतीने समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांना देण्यात येणारा आदर्श फाउंडेशन आयोजित - २०२५ चा पत्रकारिता क्षेत्रातील समाजभूषण आदर्श पत्रकार पर्सन ऑफ द इयर मानाचा पुरस्कार दैनिक वसंतसागर साप्ताहिकाचे संपादक आनंदा सुतार यांना निवृत्त शिक्षण सहसंचालक एम. के. गोंधळी, यांच्या हस्ते दसरा चौक येथील शाहु स्मारक भवन कोल्हापूर येथे सभागृहात प्रदान करण्यात आला.
माजी खासदार निवेदिता माने, आनंदा सुतार यांच्या सह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६० जणांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विजय लोहार यांनी स्वागत केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ. भगवानराव साळुंखे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार निवेदिता माने, निवृत्त शिक्षण सहसंचालक एम. के. गोंधळी उपस्थित होते. मराठा युवा संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, श्री संत भोजलिंग काका सुतार समाज सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष सुदामराव गायकवाड, सिने अभिनेत्री, कोरिओग्राफर सौ. शर्मिला वंडकर, अखिल महाराष्ट्र सुतार महासंघ पुणेचे शहराध्यक्ष रवींद्र रायकर, विश्वकर्मा राष्ट्रीय वंशीय सेना गोवा राज्यचे प्र. संपर्क प्रमुख शिवाजी सुतार, प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब लोहार, अशासकीय तांत्रिक माध्यमिक शिक्षक कर्मचारी महासंघाचे सल्लागार विलास आंग्रे, पत्रकार सिने अभिनेते डॉ. दगडू माने, आदी उपस्थित होते.
सदरचा पुरस्कार हा मी माझ्या शालेय व महाविद्यालयीन जीवनातील मित्र मैत्रिणींना समर्पित करत आहे .त्यांनी दाखवलेले प्रेमाने तसेच आदर्श फाउंडेशनने माझ्या कार्याची घेतलेली दखल आणि या पुरस्कारासाठी झालेल्या माझ्या निवडीने मी भारावून गेलो आहे. मी समाजातील इतर माझ्या प्रती असणाऱ्या कृतज्ञता व प्रेम करणाऱ्या व दैनिकातील ज्येष्ठ सहकारी यांचे मी आभार मानतो.
आनंदा सुतार( पुरस्कार प्राप्त सत्कारमुर्ती )
संस्थापक-संपादक, साप्ताहिक दैनिक वसंत सागर, सांगली जिल्हाध्यक्ष ग्राहक हित समिती, जिल्हा संघटक असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट, व्यवस्थापक, कलारत्न सह मुद्रणालय, कार्यकारणी सदस्य, कलारंग कला महोत्सव, तज्ञ संचालक कलारत्न सर्व साधारण संस्था, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम युवक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, संस्थापक अध्यक्ष ब्राह्मचैतन्य विविध उद्योग समूह, सदस्य, शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ,व डिजिटल मीडिया परिषद, ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न प्रामुख्याने सोडविणे यासाठी विशेष कार्य सामाजिक सेवाभावी संस्थे मार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे ऊपेक्षित तळागाळातील ग्रामीण जनतेचे प्रश्नांना वाचा फोडणे लेखणीच्या माध्यमा तून जनतेचे प्रश्न स्वतंत्ररित्या मांडण्यासाठी स्वत चे व्यासपीठ असावे म्हणून दैनिक वसंत सागरची निर्मिती सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कलारंग कला महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड तयार करणे आदी सामाजिक उपक्रम सुरू आहेत.
0 Comments