शिराळा,ता.२८:सांगली जिल्ह्यातील चांदोली पर्यटन विकसित होण्यासाठी व अभयारण्यलगत असणाऱ्या गावांचे प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून व शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहेत अशी मागणी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी ते नाईक म्हणाले,चांदोली अभयारण्यातील जंगली प्राण्यापासून होणारे शेतीचे नुकसान,नागरी वस्तीमध्ये होणाऱ्या हल्ल्यापासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी चांदोली अभयारण्य भोवती तारेचे कुंपण करण्याचा प्रस्ताव मार्गी लावण्यात यावा. सांगली जिल्ह्यातील चांदोली पर्यटन विकसित करणेसाठी व मणदुर पैकी धनगरवाडा,विनोबाग्राम येथील सर्वे नंबर २२१अ व २२२ चे सातबारा वरील सरकार व वन खात्याची नावे कमी करणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे बरोबर बैठक बोलवावी. आरळा पैकी कोकणेवाडी,भाष्ठे वस्ती, मणदूर पैकी मिरूखेवाडी या गावचे पावसाळी नैसर्गिक आपत्ती पासून सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे कामी योग्य नियोजन करावे.जानाईवाडी (चांदोली बुद्रुक)येथील अभयारण्यग्रस्त नऊ कुटुंबांचा लोमकळत असलेला पुनर्वसनाचा प्रश्न अशा विविध प्रश्न संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन हे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत.
यावेळी चांदोली पर्यटन विकसित होण्यासाठी व अभयारण्यलगत असणाऱ्या गावांचे प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी मागणी केलेल्या प्रश्नासंदर्भात लवकरच जे प्रश्न जिल्हाधिकारी स्तरावर आहेत.त्या प्रश्नासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू.जे प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित आहेत.त्यांचा पाठपुरावा करून तेही प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्याकडून निश्चित प्रयत्न केले जातील आश्वासन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.
0 Comments