BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यात २१८६ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व १८४४ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरीत होणार



फेब्रुवारी २०२५ कॅलेंडर
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३ शिराळा,ता.२०: शनिवारी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (टप्पा २) अंतर्गत शिराळा पंचायत समिती येथे आमदार सत्यजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील २१८६ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व १८४४ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरीत करण्यात येणार आहे.त्याच दिवशी सर्व ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लाभार्थी आणि ग्रामस्थ यांनी सदर कार्यक्रमात पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर दुपारी ३.३० वा पासून सहभागी व्हावे असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे. यावेळी ते म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री,अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ मधील राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजूरी पत्र व किमान १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम शनिवारी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०४.४५ वाजता, मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे या ठिकाणी आयोजित केला आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमाबरोबरच राज्यातील जिल्हा,तालुका, ग्रापंचायत या तिन्ही स्तरावर देखील घरकुल लाभाथ्यांना मंजूरीचे पत्र वितरणाच्या कार्यक्रम आयोजित केला आहे. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य यांचे उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.सदर राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर करण्यात येणार असून, सदर कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरुन व्हिडीओ कॉन्फरन्स‌द्वारे या गृहोत्सावाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यासाठी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्व ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३
फेब्रुवारी २०२५
रवि सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28

Post a Comment

0 Comments