BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नविन राष्टीय महामार्गाचे विस्तारीकरण करा -माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक

फेब्रुवारी २०२५ कॅलेंडर
महत्वाची बातमी ---शिराळा येथे मरीमी चौकात आज सायंकाळी ७ वाजता पृथ्वीराज माळी यांचा पोवाड्याचा कार्यक्रम. शिराळा:मिरज-सांगली-पेठ पर्यंत असणाऱ्या या नविन राष्टीय महामार्गाचे विस्तारीकरण करून तो मार्ग पेठ-शिराळा-मलकापूर-अनुस्कुरा ते मुंबई-गोवा महामार्गा पर्यंत करावा अशी मागणी सडक परिवहन व राज्यमार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली. शिराळा येथे संपर्क कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले की, इस्लामपूर येथे केंद्रीय मंत्री कार्यक्रमात निमित्ताने आले होते.त्यावेळी त्यांची भेट घेऊन आमच्या असणाऱ्या मागणीचे त्यांना निवेदन दिले.त्यांच्याशी या बाबत सविस्तर चर्चा ही केली आहे. आम्ही केलेली मागणी ही रास्त असल्याचे त्यांनी नमूद करून तसा विचार करू म्हणून सांगितले आहे.सांगली ,मिरज कुपवाड,महानगरपालिका, इस्लामपूर,आष्टा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची होणारे गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या मागणी नुसार पुणे-बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मिरज-सांगली-पेठ या रस्त्याची दर्जोन्नती करून त्यास राष्ट्रीय महामार्गचा दर्जा देण्यात आला आहे.या नवीन मार्गाच्या चौपदारी करणाचे काम सध्या जलद गतीने सुरु आहे.या महामार्गाचा विस्तार पेठ-शिराळा-मलकापूर-अनुस्कुरा ते मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गा पर्यंत करणे आवश्यक आहे.हा प्रस्तावित महामार्ग सांगली,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना कोकण व गोव्यात जाणे सोयीचे होणार आहे.सध्या रस्त्याचा दर्जा राज्य महामार्गाचा असून हा जर तो राष्ट्रीय महामार्ग झाला तर सोयीचे होईल.शिराळा तालुक्यातुन एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही.हा मार्ग झाला तर शिराळा नागपंचमी, आंबामाता मंदिर,गोरक्षनाथ मंदिर,भुईकोट किल्ला येथे प्रस्तावित असणारे धर्मवीर संभाजी महाराज स्मारक,चांदोली धरण,राष्ट्रीय उद्यान पहाणे अधिक सोयीचे होईल.त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंड,विशाळगड,पन्हाळा,या किल्ल्याकडे पर्यटकांना जाणे सोयीचे होईल.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिरज, सांगली, पेठ या नवीन मान्यता दिलेल्या राष्ट्रीय महामार्गचा विस्तार पेठ, शिराळा, मलकापूर अणुसखोरा ते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असा करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.याबाबत आमदार विनय कोरे व रत्नागिरी जिल्ह्यातील आमदर महोदयांना भेटून याचा आणखी पाठपुरावा करू.
फेब्रुवारी २०२५
रवि सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28

Post a Comment

0 Comments