BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुळीकवाडी मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा ड्रोनद्वारे सर्व्हे

फेब्रुवारी २०२५ कॅलेंडर
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३ शिराळा,ता.२०: गिरजवडे पैकी मुळीकवाडी मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा पाटबंधारे विभाग व भूमि अभिलेख अधिकाऱ्यांच्याकडून ड्रोन द्वारे सर्व्हे करण्यात आला आहे.त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. शिराळा तालुक्यातील गिरजवडे पैकी मुळीकवाडी ते मुख्य रस्त्याच्या अपुऱ्या असणाऱ्या कामाबाबत गिरजवडे, मुळीकवाडी ,मोंडेवाडी परिसरातील शालेय विद्यार्थी व नागरिकांनी अनेक वेळा शासनाच्या दारात धरणे आंदोलन केले होते .त्यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांच्या कडून सामोपचाराने मार्ग नाही निघाला तर भूसंपादन करून हा प्रस्ताव मार्गी लावला जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु भूसंपादन करण्याचा प्रस्तावाला ड्रोनच्या साह्याने मोजणी करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा लागत असल्यामुळे हा अनेक दिवस सिटी सर्व्हे व पाटबंधारे विभागाच्या समन्वयामुळे हा प्रस्ताव प्रलंबित होता. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी पाटबंधारे व सिटी सर्व्हे विभागाचा समन्वय साधून पाठपुरावा केला होता. त्यानुसार संबंधित विभागाकडून ड्रोनच्या सहाय्याने सर्वे करून भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच भूसंपादनाचा प्रस्ताव मंजूर होऊन मुळीकवाडी ते मुख्य रस्ता हा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. जलसंधरण अधिकारी संदीप देवकर ,भूमी अभिलेख अधिकारी सरपंच सचिन देसाई,अध्यक्ष आनंदा मोंडे, महादेव पाटील, सुखदेव मुळीक,नामदेव सावंत,आनंदा मुळीक, शरद पाटील, प्रतीक पाटील, साहिल सावदारकर उपस्थित होते.
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३
फेब्रुवारी २०२५
रवि सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28

Post a Comment

0 Comments