BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एस.टी आंदोलनाचा असा झाला परिणाम

फेब्रुवारी २०२५ कॅलेंडर
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३ शिराळा आगाराच्या योग्य नियोजन अभावी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसणारा फटका, प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी केलेल्या आंदोलनातील विविध मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणार गैरसोय बऱ्यापैकी दूर झाली आहे. नव्याने मागणी करण्यात आलेल्या गाड्या उपलब्ध होताच त्यामध्ये आणखी सुलभा येईल,अशी माहिती विराज उद्योग समूहाचे विराज नाईक यांनी दिली. ते म्हणाले, 7 फेब्रुवारी रोजी शिराळा बसस्थानकावर माझ्यासह यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विद्यार्थी, प्रवाशी सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन आगार प्रशासनास दिले होते. त्याचा सातत्याने पाठपुरावा करत राहिलो. याबाबतची माहिती घेण्यासाठी आगारप्रमुख धन्वंतरी ताटे यांच्या कार्यालयात बैठक झाली. आंदोलनानंतर आगार प्रशासनाने कोणती पावले उचलली. याबाबत सविस्तर माहिती घेतली. आगारप्रमुखानी त्याचे लेखी उत्तर दिले आहे. अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, बैठकीत दिलेल्या माहितीनुसार शिराळा-लादेवाडी-शिराळा (जांभळेवाडी व पवारवाडी थांब्यासह) सकाळी 7 वा. तसेच देववाडी सकाळी 9 वाजताची फेरी सुरू करण्यात आली आहे. शिराळा-कांदे-शिराळा सायंकाळी 5 वाजताची फेरी सुरू झाली आहे. शिराळा ते इस्लामपूर भटवाडी-करमाळे-सुरूल-ओझर्डे-नायकवाडी-पेठ मार्गे जाणारी फेरी सुरू करण्यात आली. शिराळा ते कोकरूड मार्गावर धावणाऱ्या गाड्या बिऊर-शांतीनगर येथे थांबण्यास सुरवात झाली आहे. 5 मिडी बसची व 20मोठ्या गाड्यांची मागणी केली आहे. त्या मिळताच इतर मार्गावर फेऱ्या सुरू होऊन प्रवाशांची गैरसोय टाळता येईल. ते म्हणाले, शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय होऊ नये व शिवाय त्यांना विभागवार पास मिळण्याची सोय व्हावी हा हेतू आंदोलन करण्यामागे महत्वाचा होता. त्यानुसार तालुक्यातील कोकरूड, सागाव, मांगले येथे पास देण्याची सुविधा सुरू झाली आहे. शिराळा स्थानकासह कोकरूड येथे दररोज पास देण्यात येतील. सागाव येथे शुक्रवार व शनिवार, मांगले येथे बुधवार व गुरुवार तर, सोमवार व मंगळवार शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी पास देण्याची सुविधा सुरू झाली आहे. बैठकीस आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक जयंत पाटील, लिपिक निखिल गराडे व शशिकांत गावित तसेच बिऊरचे सरपंच राजेंद्र पाटील, तडवळे सरपंच प्रियांका पाटील, सचिन पाटील, गिरजवडे सरपंच सचिन देसाई, कणदूरचे सत्यजित पाटील, भटवाडीचे माजी उपसरपंच सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३
फेब्रुवारी २०२५
रवि सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28

Post a Comment

0 Comments