BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पारधी समाजासाठी वसाहत निर्माण करणार -प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन

फेब्रुवारी २०२५ कॅलेंडर
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३ शिराळा,ता.२०:पंडित दीनदयाळ उपाध्ये योजनेअंतर्गत पाठपुरावा करून पारधी समाजासाठी आदर्श वसाहत निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केले. शिराळा तहसील कार्यालयात पारधी पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने ५ व ६ फेब्रुवारी रोजी शिराळा तहसील समोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले होते त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली होती. यावेळी तहसीलदार शामला खोत-पाटील,नायब तहसीलदार हसन मुलाणी,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, दलित महासंघाचे राज्याध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे डॉ.सुधाकर वायदंडे यांच्यासह तालुक्यातील सर्व गावचे विस्तारअधिकारी,मंडळ अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक,सरपंच, पोलिस पाटील उपस्थित होते. श्रीनिवास अर्जुन म्हणाले,पंडित दीनदयाळ उपाध्ये योजने अंतर्गत वसाहत निर्माण करून लवकरच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे . सर्व शासकीय योजनांचा लाभ वंचित घटकाला देण्यासाठी प्रशासन ही अग्रही आहे. पारधी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी दलित महासंघाचे प्रयत्न आहेत. त्याला प्रशासन सर्वोतोपरी मदत करेल. सुधाकर वायदंडे म्हणाले,पुनर्वसनाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी.या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा . पारधी समाजासाठी असणाऱ्या सर्व योजनांची ठोस अंमलबजावणी करण्यात यावी. यावेळी दलित महासंघाचे पोपटराव लोंढे, शशिकांत नांगरे,सदाभाऊ चांदणे,नागनाथ घाटगे,आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जितेंद्र काळे,टारझन पवार,इंद्रजित काळे,राकेश काळे,अविशाम भोसले, दिकल पवार,रोशना पवार,गुलछडी काळे,जहांगीर पवार,गुडिया काळे उपस्थित होते.
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३
फेब्रुवारी २०२५
रवि सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28

Post a Comment

0 Comments