BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे अपघातात एक ठार चार जखमी





फेब्रुवारी २०२५ कॅलेंडर
आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३ शिराळा,ता.२४:येथील बाह्य वळण रस्त्यावर गोरक्षनाथ मंदिर ते बिऊर दरम्यान असणाऱ्या मोरणा नदीच्या पुलाजवळ पिकअप गाडी व देवदर्शनासाठी निघालेल्या खासगी चारचाकी गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात आय.टी .इंजिनिअर असणारा युवक ठार तर चार गंभीर जखमी झाले आहेत. कैलास ताराचंद चव्हाण (वय ३० रा.पुणे आळंदी , मूळ गाव वरदडी बुद्रुक, ता.सिंदखेडराजा .जि.बुलढाणा)असे मयताचे नाव आहे.जखमींच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सोमवारी (ता.२४) रोजी पहाटे चार च्या दरम्यान घडली.याबाबत दूध वाहतूक गाडी चालक अमोल जोतीराम शेटके (वय ४० ) रा. बेलदारवाडी ता. शिराळा) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की,कैलास चव्हाण हे मुळचे वरदडी बुद्रुक, ता.सिंदखेडराजा .जि.बुलढाणा) येथील रहिवाशी आहेत. ते पुणे येथे एका कंपनीत आय.टी .कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरीस होते. त्यांचा दोन वर्षा पूर्वी विवाह झाला आहे. ते पत्नी कांचन समवेत पुणे आळंदी येथे राहत होते. काल रविवारी नाणीज कडे देव दर्शनासाठी पत्नी कांचन ,सासरे भीमराव व सासू वर्षा यांच्या समवेत चालक सह निघाले होते. पाहटे शिराळा येथे आले असता बाह्यवळण रस्ता गोरक्षनाथ मंदिर व बिऊर दरम्यान असणऱ्या मोरणा नदीवरील पुलाजवळ बिऊर कढून शिराळा कडे येणारी पिकअप गाडी व देवदर्शनासाठी निघालेल्या चारचाकीची धडक झाली. यावेळी चारचाकीतील कैलास चव्हाण यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी कांचन चव्हाण ( वय २३), सासरे भीमराव दलपत पवार (वय ५० वर्षे) ,सासू वर्षा भीमराव पवार (वय ४५ दोघे रा. गारटेकी ता.मंठा जि. जालना) व चालक पवन संतोष राठोड ( वय २४, रा.आळंदी मूळगाव पिंपरखेड बुद्रुक ता. सिंदखेडाराजा जि. बुलढाणा) हे चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिके मधून तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास हवालदार सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय पाटील व पोलीस हवलदार सुभाष पाटील हे करत आहेत. कैलास याच्या पश्चात पत्नी,आई,वडील,भाऊ असा परिवार आहे. ते शेवटचे बोलणं कैलास याने आपले मोठे बंधू प्रेम यांना शनिवारी तर आई वडीलांना रविवारी मी नाणीजला देवदर्शनासाठी जाणार असल्याचे सांगितले होते.आज सोमवारी पाहटे पाच वाजता अपघात झाल्याची माहिती प्रेम यास कैलासची पत्नी कांचन हिने सांगितले. त्यावेळी चव्हाण कुटुंबीय हादरून गेले. कैलास याच्या मृत्यूमुळे आपल्या आई वडील व भावासोबत त्याचे मोबाईलवर झालेले शेवटचे बोलणे होते. त्यावेळी समजल कैलास गेला कैलास याचे मुळगाव बुलढाणा जिल्ह्यातील वरदडी बुद्रुक येथील आहे. त्याच्या अपघाताची माहिती मिळताच त्याचा मोठा भाऊ प्रेम हा तिथून निघाला.कराड येथे जखमींना उपचारासाठी दाखल केल्याचे समजल्याने त्यांना पाहण्यासाठी त्यांचे पुणे येथे असणारे नातेवाईक निघाले. त्यांनी गुगल मॅपवर कराड १४० किलोमीटर पाहिल्याने मोटारसायकल वरून आले.त्या ठिकाणी आल्यानंतर कैलास याचा मृत्यू झाल्याचे समजले .त्यामुळे त्यांना पुन्हा चाळीस किलोमीटर शिराळा येथे यावे लागले.दूरचे नातेवाईक असल्याने सर्वांची तारांबळ व धावपळ उडाली. नातेवाईक आल्यानंतर सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:संपर्क 9890881782,9766293909
फेब्रुवारी २०२५
रवि सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28

Post a Comment

0 Comments