जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम.
जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.
संपर्क 9890881782,9766293909
.
इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६
.
शिराळा येथे श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या उदघाट्न प्रसंगी बोलत होते.यावेळी आमदार देशमुख म्हणाले,ग्रामीण भागातील मुलांच्या भविष्यासाठी चांगल्या अभ्यासिकेची गरज आहे.परिस्थिती वाईट असते;त्यावेळी माणूस शिकतो.कोरोना काळात मुलांच्या अनेक शैक्षणिक संध्या वाया गेल्या आहेत.शिराळ्यात सुरु झालेल्या अभ्यासिकेचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना होईल.
सम्राट महाडिक म्हणाले,ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी शिराळा पॅटर्न तयार करण्याची गरज आहे.त्यासाठी आम्ही सहकार्य करू.आपल्या मुलांच्यात गुणवत्ता आहे.त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.गोरगरीब मुलांच्यासाठी विशेष लक्ष द्या.त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करा.
विराज नाईक म्हणाले,शिराळा सारख्या डोंगरी भागातील मुलांना चांगली अभ्यासिका असणे गरजेचे होते.ती उणीव या अभ्यासिकेच्या माध्यमातून भरून निघेल.शिक्षणा शिवायपुढे झेप घेता येत नाही.त्यामुळे योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.या अभ्यासिकेचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना होईल.
प्रास्ताविक श्रीराम नांगरे यांनी केले.सूत्रसंचलन भरत नलवडे यांनी केले.
यावेळी रणजितसिंह नाईक,पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम,रेठरे धरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील,वसंत कांबळे,सम्राट शिंदे,कैलास देसाई,शंकर नांगरे,संदीप पाटील,प्रा.सम्राट शिंदे,उदय कारखान्याचे संचालक सुरज सावंत,निलेश आवटे,दिनकर पवार,अरुण शेटके,पंकज परिट,क्षितिज पाटील, ओंकार वरुटे,रायसिंग पाटील,दिग्विजय पाटील,अजिंक्य कोळी
उपस्थित होते.आभार ऋषिकेश घोडे यांनी मानले.
सहज दगड पुढऱ्यांना नव्हे अधिकाऱ्यांना लागला पाहिजे
आपल्या शिराळा विधानसभा मतदार संघात कुठे ही सहज दगड मारला तर तो पुढऱ्यांना नव्हे तर चार अधिकाऱ्यांना लागला पाहिजे अशा युपीएससी व एमपीएससी अधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे.आपल्याकडे सध्या अधिकाऱ्यांपेक्षा पुढाऱ्यांची संख्या जास्त आहे.त्यामुळे सम्राट बाबा महाडिक आपण जास्तीजास्त अधिकारी घडवण्यासाठी काम करूया असे आमदार सत्यजित देशमुख यांनी शाब्दिक कोटी करताच सर्वत्र हश्या पिकला
0 Comments