BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महाराष्ट्रातील टॉप मोस्ट शिराळा नगरी करण्याचे प्रयत्न करूया -आमदार सत्यजित देशमुख

आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text
जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .
शिराळा,ता,२८:शिराळा शहराच्या चौफेर विकासाचा नकाशा घेऊन पुढे जाऊ.त्यासाठी विकासाची योजना सजगपणे राबविण्याची गरज आहे.त्यातून महाराष्ट्रातील टॉप मोस्ट शिराळा नगरी करण्याचे प्रयत्न करूया असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले. शिराळा नगरपंचायत येथे महाराष्ट्र अग्नीसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अग्नीशमन वाहनाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.यावेळी देशमुख म्हणाले,तुही कुठे असला तरी आपले काम बोलले पाहिजे. नगरपंचायतीच्या माध्यमातून जनतेला काय हवे ते द्या.गुणवत्तेची कामे होणे गरजेचे आहे. १८ ते २० कोटीच्या निधीचा चांगल्या प्रकारे विनियोग झाला पाहिजे. शिराळ्यात होणारे बगीचे हे नाविन्यपूर्ण व्हायला हवेत. चांगली अभ्यासिका पाहिजे त्यासाठी आमच्या फंडातून लागणाऱ्या काही पुस्तकासाठी आम्ही निधी देऊ.शहरात कामे करताना ठेकेदारानी लोकांची वाहवा मिळेल अशा पध्दतीने कामे करावीत.या शहरासाठी काहीतरी आगळे वेगळे काम करूया. येत्या अधिवेशनात नागपंचमीच्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. सुसज्ज अशी सुंदर नगरपंचायतची इमारत व्हायला हवी.

 माजी सभापती भगतसिंग नाईक म्हणाले,अग्निशमन यंत्रणा उपलब्ध झाल्याने शिराळा शहराच्या बाबत चांगले काम झाले आहे. नगरपंचातच्या माध्यमातून शहरात होणाऱ्या कामावर गुणवत्तेबाबत लक्ष असणे गरजेचे आहे. यावेळी सम्राट शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी तर सूत्रसंचलननलिनी भिंगारदेवे यांनी केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार हसन मुलाणी ,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, संपतराव देशमुख, माजी नगराध्यक्षा प्रतिभा पवार, सुनीता निकम,रणजितसिंह नाईक, केदार नलवडे, जयसिंगराव शिंदे, हणमंतराव पाटील, किर्तीकुमार पाटील,अभिजित नाईक, संभाजीराव नलवडे,संतोष इंगवले,बसवेश्वर शेटे, अधीक्षक नारायण गोसावी,सहायक अधीक्षक प्रकाश शिंदे,अभियंता स्नेहल पन्हाळकर ,सुभाष इंगवले उपस्थित होते.आभार हणमंतराव कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments