शिराळा,ता.१२:शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव,शिराळा व वाकुर्डे बुद्रुक पैकी मानेवाडी या तीन ठिकाणी केल्या घरफोडीत प्रकरणी शिराळा पोलिसांनी प्रथमेश अमित जाधव (वय२४,धंदा मजुरी रा. शिराळा व करण नंदकुमार सातपुते (वय २६) धंदा खाजगी नोकरी रा. खेड या दोघांना अटक केली आहे.त्यांच्याकडून ६,३३,७६६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.याबाबत गुंगा शंकर डफळे (वय ५०) रा. मानेवाडी- वाकुर्डे बुद्रुक यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना ५ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या चोरीच्या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या नुसार पोलीस तपास करत आहेत.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी,पोलीस अधीक्षक संदीप घुगे,अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर ,इस्लामपुरचे पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी मालमत्तोविरुध्दचे गुन्हयांचा तपास करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या.त्या नुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम व कर्मचारी भाटशिरगाव,शिराळा व वाकुर्डे बुद्रुक पैकी मानेवाडी येथील घर फोडीच्या गुन्हयाचा तपास करत होते. दरम्यान पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम यांना गोपनीय बातमीदारामार्फत वाकुर्डे बुद्रुक पैकी मानेवाडी येथील घर फोडी प्रथमेश जाधवने केली असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.त्यानुसार त्यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल करून करण नंदकुमार सातपुते रा.खेड हा आपला साथीदार असलेचे त्याने सांगितले. त्यांना अटक करुन त्यांचेकडुन ६,१३,५८० रुपयाचे सोन्याचे दागिने व लगड, ४६८६ रुपयाचे चांदीचे दागिने, १०,५०० रुपये रोख रक्क्म, ५००० रुपयाची एक दुचाकी मोटर सायकल असा एकूण ६,३३,७६६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे व पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात हे करत आहेत.
यांनी घेतले विशेष परिश्रम
निरीक्षक सिध्देश्वर जंगम,सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे व पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जगदाळे, सहायक पोलीस फौजदार शशिकांत लुगडे,महेश गायकवाड,पोलीस हवलदार माणिक पाटील,नितीन यादव,संदिप पाटील,इरुफान मुल्ला,भुषण महाडीक,पोलीस नाईक अमर जाधव,शरद पाटील,पोलीस शिपाई अरुण मामलेकर,राजेंद्र देवळेकर,उमेश शेटे,सतिश पाटील, सायबर पोलीस ठाणे कॅप्टन गुंडवाडे,श्वान पथक सांगली पोलीस हवलदार समीर सनदी, पोलीस शिपाई शबाना आत्तार यांनी तपास कामी विशेष परिश्रम घेतले.
तिन्ही ठिकाणी चोरीची पद्धत एकच
शिराळा येथील कदम गल्लीतून १९डिसेंबर सकाळी ते २१ डिसेंबर सायंकाळी पाच दरम्यान खाशाबा पाटील यांच्या घराची कौले काढून ५ तोळे ४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते.भाटशिरगाव येथे २० डिसेंबर रोजी दुपारी बारा ते अडीच च्या दरम्यान कुंडलिक यशवंत उर्फ बाळू देसाई यांच्या घरावरील कौले काढून घरातील दोन तोळे सोने,चांदीचे दागिने , मोबाईल, व सहा हजार रुपये रोख असा ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.मानेवाडी ( वाकुर्डे बुद्रुक) येथे गुंगा शंकर डफळे यांच्या घराची कौले काढून दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख पंचावन्न हजार रुपये असा पाच लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
0 Comments